महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर जर शरद पवार राज्यसभेवर; तर पाणी फेरणार दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर!!

Sharad Pawar

नाशिक : महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर जर शरद पवार राज्यसभेवर; तर पाणी फेरणार दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर!!, हीच राजकीय घडामोडी घडण्याची पुढच्या दोन महिन्यांमध्ये शक्यता आहे.NCP unification impossible if Sharad Pawar gets mahavikas agadi support

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विलीनीकरणाची केलेली घाई सध्या तरी डब्यात गेली कारण सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रतिसादच दिला नाही. शेवटी ते थकले आणि मुकाट बसायचे निर्णय घेते झाले.

पण याच दरम्यान संजय राऊतांनी शरद पवारांच्या राज्यसभा सीटचा विषय काढला. त्यांची एप्रिलमध्ये मुदत संपल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवू, असे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे शरद पवारांच्या पुन्हा active politics नवा दौर सुरू झाला. अजित पवार हयात असताना शरद पवार रिटायरमेंट घेऊन बाजूला होणार होते. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि बाकीचे नेते निर्णय घेऊन अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादींचे विलीनीकरण करणार होते. त्यामुळे शरद पवार यांची “प्रतिमा” आणि “पुरोगामीत्व” टिकून वर भाजपच्या सत्तेचे लाभ सुद्धा मिळणार होते, असे राष्ट्रवादीकडूनच सांगितले जाते. (पण भाजपकडून त्याला कोणी दुजोरा दिला नाही.)



– political dynamics बदलली

पण अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सगळे political dynamics बदलले. पवारांच्या इच्छेनुसार राष्ट्रवादीची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हातात आयती आली नाहीत. ती सूत्रे सुनेत्रा पवारांच्या हातात गेली. शिवाय त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजप असा निर्णायक महत्त्वाचा आयाम जोडला गेला. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सगळे “डाव” केरात गेले. शरद पवारांना रिटायरमेंटचा प्लॅन बाजूला ठेवावा लागला, म्हणून तर वस्ताद पुन्हा मैदानात अशा बातम्या मराठी माध्यमांना चालवायला लागल्या.

– वस्तादाला विरोधी बाकांवरच स्थान

पण वस्तादाने पुन्हा मैदानात येऊन जर महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे मैदान मारले, तर मात्र सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व आणि दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण हे विषय त्यांना कायमचे विसरावे लागतील. कारण एकदा जर शरद पवार महाविकास आघाडीच्या संख्या बळावर राज्यसभेत पोहोचले, तर ते विरोधी बाकांवरच बसतील. मग त्यांना नव्या उमेदीने विरोधी राजकारण चालवावे लागेल. भाजपचे नेते त्यांच्या वयाचा मान जरूर राखतील, पण त्यांच्या राजकीय इच्छेनुसार विलीनीकरण किंवा सुप्रिया सुळे यांचे राजकीय बस्तान बसविणे, असल्या प्रकारांना मान्यता देणार नाहीत. कारण त्यातून राष्ट्रवादीचे बळ वाढेल आणि पर्यायाने भाजपची राजकीय डोकेदुखी वाढेल. हे भाजपचे केंद्रीय नेते कदापि सहन करण्याची शक्यता नाही.

– पवारांचा काँग्रेस विरोधात वापर

महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर शरद पवार राज्यसभेत पोहोचले, तर फार तर भाजपचे नेते आपल्या जुन्याच राजकीय वळणाने त्यांचा काँग्रेसच्या विरोधात वापर करून घेतील, पण त्यापलीकडे त्यांचे राजकीय महत्त्व वाढवून ठेवणार नाहीत. त्या उलट ते सुनेत्रा पवारांना मर्यादित अर्थानेच बळ देत राहतील. त्यांचे नेतृत्व विशिष्ट मर्यादेत फुलवत राहतील. कारण ते आणि तेवढेच भाजपच्या फायद्याचे असेल. शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाला मर्यादेच्या पलीकडे किंमत देणे भाजपला परवडणार नाही आणि भाजपवाले ते करण्याची शक्यता नाही.

NCP unification impossible if Sharad Pawar gets mahavikas agadi support

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात