दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची गरजच काय??, “हा” पर्याय उपलब्ध असताना!!

Sharad Pawar

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेल्या राजकीय बॉम्बमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुराळा उडाला. आता दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत नाही आणि झाले तर ते आपल्या अटी शर्तींवर होत नाही, हे लक्षात येताच आम्ही काय शस्त्र टाकून शरणागती पत्करायला जात नव्हतो, असा राणा भीमदेवी थाट पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी आणला. जयंत पाटलांनी सुद्धा शशिकांत शिंदे यांच्या म्हणण्याला वेगळ्या शब्दांनी दुजोरा दिला, पण दोघांनीही अजित पवारांची शपथ वाहून विलीनीकरण करण्याचा आग्रह अजित पवारांचाच होता, असा वारंवार दावा केला. “मी सुद्धा बरेच काही सांगू शकतो”, या देवेंद्र फडणवीसांच्या एका वाक्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकाच झटक्यात खाली आणले. त्यामुळे विलीनीकरणाची चर्चा वेगळ्याच दिशेने गेली. पवारांच्या राष्ट्रवादीची उताविळी त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रासमोर आली.No chance of NCP unification, but split in Sharad Pawar NCP inevitable

पण या पार्श्वभूमीवर एक पर्याय उपलब्ध असताना दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची गरजच काय??, हा खरं म्हणजे सवाल समोर आला.



– पवारांच्या इच्छेनुसार घडणार नाही

अजित पवार हयात असताना किंवा हयात नसताना त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाचा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकत नव्हती. कारण प्रश्न आणि मुद्दा सत्तेतल्या वाटपाचा होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आपल्या सत्तेतला वाटा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आमदारांना द्यायला तयार नव्हते. भाजप राष्ट्रवादीचा कोटा वाढवून द्यायला तयार नव्हता आणि ती आजही नाही. त्यामुळे अजित पवारांच्या हयातीत दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण घडून आले नाही. ते यापुढे जसेच्या तसे आणि शरद पवारांच्या अटी शर्तींवर घडून येण्याची बिलकुल शक्यता नाही.

– वेगळा दरवाजा उघडा

पण म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी अस्वस्थ किंवा सैरभैर होण्याची काहीच गरज नाही. कारण त्यांना एक वेगळाच पर्याय म्हणजे एक वेगळाच दरवाजा उघडा असू शकतो, तो म्हणजे शरद पवारांची साथ सोडून टप्प्याटप्प्याने ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल होऊ शकतात. पवारांच्या राष्ट्रवादीतले 10 आमदार किंवा बाकीचे नेते एकदम अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येऊन दाखल झाले, तर त्याला विलीनीकरण म्हणता येईल, पण ते जर टप्प्याटप्प्याने काही दिवसांच्या किंवा महिन्यांच्या अंतराने राष्ट्रवादीत दाखल झाले, तर ते किमान औपचारिक विलीनीकरण तरी म्हणता येणार नाही, त्याला पवारांची राष्ट्रवादी टप्प्याटप्प्याने फुटली, असे म्हणावे लागेल, पण त्यासाठी सुद्धा भाजपच्या नेत्यांची परवानगी लागेलच, हा भाग अलहिदा!!

– पवारांच्या अटी शर्ती गैरलागू

भाजपचे नेते सुद्धा स्वतःला गैरसोयीचे होणार नाही, अशाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत यायला निश्चित परवानगी देतील, पण त्यासाठी फक्त पवारांच्या अटी शर्ती लागूच राहणार नाहीत, तर भाजपच्या आणि सुनेत्रा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्याच अटी शर्ती त्यासाठी लागू राहतील, हे सांगायला कुठल्या मोठ्या राजकीय ज्योतिषाची गरज नाही किंवा त्यासाठी मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा विषय शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या गोटातून मुद्दामून समोर आणण्यात आला. कारण त्या निमित्ताने सुप्रिया सुळेंचे नेतृत्व पवारांना पुढे रेटायचे होते. सुनेत्रा पवारांनी पवारांचा तो डाव वेळीच ओळखून आणि त्यानंतर वेळीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन उधळून लावला. भले पार्थ पवारांनी शरद पवारांना विलीनीकरणाचा शब्द दिला असेल तरी ते विलीनीकरण आता सुनेत्रा पवारांच्या संमतीने घडवून आणण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही.

– निवडक नेत्यांनाच घेतील

पण या विलीनीकरणारा भाजपने परवानगी दिलीच नाही, तरी जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि पवारांच्या पक्षातल्या 10 आमदारांपैकी काही निवडक आमदार टप्प्याटप्प्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल होऊ शकतात भाजप स्वतःच्या अटी शर्तीवर त्यांना सत्तेच्या वाटेतला तुकडा देऊ शकते. त्यापलीकडे दुसरे काही घडण्याची शक्यता नाही. अजित पवारांची शेवटची इच्छा या नावाखाली प्रत्यक्षात शरद पवारांच्या स्वप्नातली विलीनीकरण घडणे इतक्यात तरी शक्य नाही, पण शरद पवारांची राष्ट्रवादी विस्कळीत होऊन त्यांचे नेते आणि आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत टप्प्याटप्प्याने दाखल होणे आणि त्यांना सत्तेचा तुकडा मिळणे हे निश्चित शक्य आहे. हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला राजकीय दरवाजा भाजपने खुला ठेवलाय. त्यातून कुणाला आत घ्यायचे हे भाजपच्या अटी शर्तींवर ठरेल, तसे यायचे की नाही, हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना ठरवावे लागेल. फक्त तेवढेच त्यांच्या हातात असेल.

No chance of NCP unification, but split in Sharad Pawar NCP inevitable

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात