Municipal Corporation Elections : मनपा निवडणुकांसाठी प्रभागरचना वेळापत्रक जाहीर; चार महिन्यांचा कालावधी, हे आहेत महत्त्वाचे टप्पे

Municipal Corporation Elections

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Municipal Corporation Elections  राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे अखेर गती मिळू लागली आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असलेल्या प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ऑक्टोबर 2025 मध्ये ही रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतरच महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे.Municipal Corporation Elections

या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने चार महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे, ज्यामध्ये प्रभाग रचना अंतिम केली जाईल. मुंबई महापालिकेची प्रभागरचना 6 ऑक्टोबरनंतर, तर ड वर्गातील नाशिक, औरंगाबादसारख्या महापालिकांची प्रभागरचना 13 ऑक्टोबरपर्यंत अंतिम केली जाणार आहे.



या महत्त्वाच्या टप्प्यानंतर राज्यातील निवडणुकांची प्रक्रिया सुरु होणार असून, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या इत्यादींच्या निवडणुका चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत. यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच मतदान प्रक्रियेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग यासंदर्भात सध्या तयारी करत आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग, ओबीसी आरक्षणाचा पेच, न्यायालयीन प्रक्रिया यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत.

हे आहेत महत्त्वाचे टप्पे

प्रारुप प्रभाग रचना तयार करणे : यामध्ये जनगणनेची माहिती तपासणे, स्थळ पाहणी, गुगल मॅप वर प्रभागाचे नकाशे तयार करणे, प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून त्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे. 17 जून ते 31 जुलै दरम्यान हे काम पूर्ण केले जाणार आहे.

प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागास सादर करणे – 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट

प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे – 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट

राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे

प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती मागवणे – 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट

प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेणे – 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर

सुनावणीनंतर हरकती आणि सूचनांवर शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभाग रचना अंतिम करून नगर विकास विभागाला पाठवणे

अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे- 26 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर

राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देणे

राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे – 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर

Municipal Corporation Elections Ward Delimitation Schedule Announced

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात