पाहा अंगावर रोमांच आणणारा आणि प्रत्येक भारतीयास अभिमान वाटावा असा व्हिडिओ, पंतप्रधान मोदींनी केला आहे शेअर Even in Austria, Modi-Modi the atmosphere of Vienna was filled with ‘Vande Mataram
विशेष प्रतिनिधी
व्हिएन्ना : रशियापाठोपाठ आता ऑस्ट्रियामध्येही ‘मोदी-मोदी’चा घोष ऐकू येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर आहेत. ऐतिहासिक दौऱ्यावर पंतप्रधान मोदी बुधवारी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे पोहोचले, तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबद्दल ऑस्ट्रियन लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरून हॉटेल रिट्झ-कार्लटन येथे पोहोचले तेव्हा तेथे त्यांचे संगीतमय स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ऑस्ट्रियन कलाकारांनी भारतीय राष्ट्रीय गीत ‘वंदे मंतरम’ ची धून गायली आणि वाजवली. या वेळी संपूर्ण व्हिएन्ना भूमी वंदे मातरमने गुंजत असल्याचा भास झाला. आता या अभिमानास्पद क्षणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
Austria is known for its vibrant musical culture. I got a glimpse of it thanks to this amazing rendition of Vande Mataram! pic.twitter.com/XMjmQhA06R — Narendra Modi (@narendramodi) July 10, 2024
Austria is known for its vibrant musical culture. I got a glimpse of it thanks to this amazing rendition of Vande Mataram! pic.twitter.com/XMjmQhA06R
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2024
ऑस्ट्रियन कलाकारांच्या तोंडून वंदे मातरम ऐकून पंतप्रधान मोदी आनंदित झाले. मोदींनी या संगीतमय स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत त्याने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘ऑस्ट्रिया आपल्या जीवंतय संगीत संस्कृतीसाठी ओळखला जातो. वंदे मातरमच्या या अप्रतिम सादरीकरणातून मला याची झलक मिळाली!’
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ऑस्ट्रियन कलाकाराने पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी वंदे मातरम कसे गायले आणि त्याची धून वाजवली. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून जाईल. ऑस्ट्रियन कलाकारांनी 2 मिनिटांपेक्षा जास्त काळ चाललेल्या व्हिडिओमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिला.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी गायलेल्या ‘वंदे मातरम’चा हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करेल. व्हिडिओच्या शेवटी, ऑस्ट्रियन कलाकारांच्या तोंडून वंदे मातरम् ऐकल्यानंतर मोदी कसे आनंदी दिसले, हे दिसत आहे. त्यांनी ऑस्ट्रियन कलाकारांच्या कामगिरीचे वर्णन ‘उत्कृष्ट’ असे केले. यानंतर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले. यावेळी सभागृहात एक विलक्षण नजारा पाहायला मिळतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App