भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी केली आहे टीका FIR filed against DMK leader for making insulting remarks about Modi
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तामिळनाडू सरकारचे मंत्री आणि द्रमुक नेते अनिथा राधाकृष्णन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. भाजप जिल्हा सचिवांच्या तक्रारीच्या आधारे, मेघनापुरम पोलिसांनी कलम 294 (बी) अंतर्गत मंत्री अनिता राधाकृष्णन यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी शनिवारी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, द्रमुक नेत्याने आमच्या पंतप्रधानांविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली. असभ्य वर्तन करून त्यांनी खालची पातळी गाठली आहे. त्यांनी पुढे लिहिले की, त्यांच्याकडे टीका करण्यासारखे काहीही नसताना द्रमुकचे नेते या पातळीवर घसरले आहेत. द्रमुकच्या खासदार कनिमोळी मंचावर होत्या आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्याला परावृत्त करण्याची तसदी घेतली नाही.
हा व्हिडिओ शुक्रवारी थुथुकुडी जिल्ह्यात द्रमुक उमेदवार कनिमोझी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांच्या बैठकीचा आहे. या बैठकीला तामिळनाडूचे मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्री अनिथा राधाकृष्णनही उपस्थित होते. तमिळनाडूच्या भाजप हँडलवरूनही हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. राधाकृष्णन यांनी मोदींबद्दल घृणास्पद पद्धतीने बोलल्याचे लिहिले होते. द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी हे घृणास्पद कृत्य पाहिल्याचा आरोपही करण्यात आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App