जातीचे राजकारण फेल गेल्यावर उत्तर – दक्षिण विभाजनकारी राजकारणाचा राहुल गांधींचा डाव; राजीव चंद्रशेखरांनी सांगितली क्रोनोलॉजी!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सनातन धर्माला द्रविड मुन्नेत्र कळघमच्या खासदाराने हिंदी राज्यांचा “गोमूत्र स्टेट” म्हणून अपमान केल्यानंतर देशभर संताप उसळला असताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी नेमक्या शब्दांमध्ये आज या विभाजनकारी राजकारणाची संपूर्ण पोलखोल केली. हे विभाजनकारी राजकारण कोणी आणि कशासाठी सुरू केले आणि ते सध्या कशात परिवर्तित झाले??, याची क्रोनोलॉजीच राजीव चंद्रशेखर यांनी उघड्यावर आणली. Chronology narrated by Rajeev Chandrasekhar

राजीव चंद्रशेखर म्हणाले :

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू असताना राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरत देशात जातीच्या राजकारणाला खतपाणी घातले. जातीच्या मुद्द्यावर समाजात फूट पाडण्याचा डाव खेळला.

त्याचवेळी कम्युनिस्टांनी केरळमध्ये हमास दहशतवादी संघटनेला पाठिंबा देण्यासाठी “हिंदुत्व उकडून फेका” हा धार्मिक दंगली घडविण्याचा अजेंडा चालवला. काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी एकाच वेळी धार्मिक आणि जातीय दुही माजवण्याला चिथावणी दिली.

पण विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 3 राज्यांमध्ये काँग्रेसचा दणकून पराभव झाला आणि भाजपचा विजय झाला. त्यानंतर काँग्रेसने आपली स्ट्रॅटेजी बदलत उत्तर – दक्षिण विभाजनकारी राजकारणाला सुरुवात केली.

एरवी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी प्रत्येक विषयात तोंड खुपसतात, पण द्रविड मुन्नेत्र कळघमच्या खासदाराने उत्तरेतील राज्यांचा “गोमूत्र स्टेट” म्हणून अपमान केला, त्यावर ही दोन्ही बहीण भावंडे एक शब्द देखील बोलली नाहीत, यातूनच त्यांना देशात फूट पाडणारे वेगवेगळे फंडे चालवण्यातच रस असल्याचे स्पष्ट होते.

Chronology narrated by Rajeev Chandrasekhar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात