‘’…त्यामुळे मी राजकारणातून दोन महिने सुट्टी घेत आहे?’’ पंकजा मुंडेंचं पत्रकरपरिषदेत केलं जाहीर!

“माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणे हे माझ्यासाठी दु:खद’’ असंही बोलून दाखवलं आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपा नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या कायमच चर्चा सुरू असतात. एवढंच नाहीतर त्या भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या वावड्या अनेकदा उठल्याचे आपण आतापर्यंत पाहिले आहे. मात्र वेळोवेळी पंकजा मुंडे यांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. दरम्यान, आज पत्रकारपरिषदेत पंकजा मुंडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे पंकजा मुंडे आता राजकारणातूनच सन्यास घेणार की काय? अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. thats why I am taking two months off from politics Pankaja Munden announced in press conference

पत्रकारपरिषदेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने राजकारणातून सुट्टी घेत आहे. मी गेल्या २० वर्षांत सुट्टी घेतलेली नाही. मला एक-दोन महिने सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे”

याचबरोबर  ” माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणे हे माझ्यासाठी दु:खद आहे.  मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही, मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात?” असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.

https://youtu.be/mVe1q4p-DNg

याशिवाय, “मी नाराज आणि पक्षाच्या बाहेर जाणार अशी चर्चा होते. मी भाजपामध्येच राहणार आहे. राहुल आणि सोनिया गांधी यांना भेटले नाही. माध्यमांनी चुकीची बातमी दाखवली. ही बातमी दाखवणाऱ्या संबंधित वृत्तवाहिनीवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे.’’ असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

thats why I am taking two months off from politics Pankaja Munde announced in press conference

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात