वृत्तसंस्था
अहमदाबाद : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरवून राहुल गांधींनी बदनामी केली, त्याबद्दल गुजरात हायकोर्टाने यांची दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली. Denigration of all modis as thieves; Rahul Gandhi’s sentence was upheld by the High Court!!
देशात मोदी सरकार विरोधात महागठबंधन तयार करणाऱ्या विरोधकांना हा जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. त्यानंतर राहुल गांधींनी कालच शरद पवारांची भेट घेऊन त्यांना गरज लागल्यास मदत करण्याची तयारी दाखवली आणि आज गुजरात हायकोर्टाने त्यांची सर्व मोदींना त्यांनी चोर ठरवून बदनामी केल्याबद्दल दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कायम ठेवली. विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांना कायदेशीर पातळीवरून हा जोरदार धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात गुजरात हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र हायकोर्टाने ती फेटाळून लावत त्यांना दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली.
मोदी यांच्या आडनावाचा वापर करुन बदनामी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरात हायकोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यावर राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करत हायकोर्टात अपील केले होते. राहुल गांधी आता गुजरात हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.
2019 मध्ये कर्नाटक मधल्या सभेत राहुल गांधी देशातले सर्व मोदी चोर कसे?, असा सवाल करून संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली होती. त्या विरोधात मोदी समाजाच्या प्रतिनिधींनी गुजरात मध्ये त्यांच्या विरोधात दावा गुदरला होता. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर राहुल गांधींनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण ती शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली. त्यानंतर राहुल गांधींनी पुनर्विचार याचा याचिका दाखल केली. कोर्टाने आता ती देखील फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींचे दोन वर्षांची शिक्षा कायम राहिली असून ते आता सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App