मुकेश अंबानी पुन्हा झाले आजोबा, मोठा मुलगा आकाशची पत्नी श्लोकाने दिला मुलीला जन्म, 2020 मध्ये झाला होता मुलगा

वृत्तसंस्था

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोका हिने एका मुलीला जन्म दिला आहे. आकाश आणि श्लोका दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये त्यांना पृथ्वी नावाचा मुलगा झाला होता.Mukesh Ambani became a grandfather again, eldest son Akash’s wife Shloka gave birth to a girl, a boy was born in 2020

आकाश यांचे मित्र धनराज नाथवानी यांनी अंबानी कुटुंबातील नवीन पाहुण्याबद्दल माहिती दिली. धनराज हे राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी ट्विटरवर लिहिले- आकाश आणि श्लोका अंबानी यांना त्यांच्या छोट्या राजकुमारीच्या आगमनाबद्दल हार्दिक अभिनंदन. हा अनमोल आशीर्वाद तुमच्या आयुष्यात अपार आनंद आणि प्रेम घेऊन येवो.



आकाश-श्लोका शाळेत एकत्र शिकायचे

आकाश आणि श्लोका यांचा विवाह 9 मार्च 2019 रोजी झाला होता. दोघेही शालेय मित्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले. श्लोकाने अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून मानववंशशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून पदव्युत्तर पदवी मिळवली.

आकाश आणि श्लोकाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ येथे पार पडले होते. हे प्री-वेडिंग सेलिब्रेशन तीन दिवस चालले. या सोहळ्यात अनेक बड्या व्यक्तींचाही सहभाग होता.

श्लोका या बिझनेसमन असण्यासोबतच सोशल वर्करही

श्लोका रोझी ब्लू फाउंडेशनच्या संचालिका आहेत. श्लोका यांचे वडील रसेल मेहता या डायमंड कंपनीचे मालक आहेत. बिझनेस लेडी असण्यासोबतच श्लोका एक सोशल वर्करदेखील आहेत. त्यांनी 2015 मध्ये ConnectFor नावाची NGO सुरू केली, जी गरजूंना शिक्षण, अन्न आणि निवारा देते.

ईशा अंबानी यांना 6 महिन्यांपूर्वी झाली जुळी मुले

मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानीने नोव्हेंबरमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला. 4 वर्षांपूर्वी त्यांचा आनंद पिरामलसोबत विवाह झाला होता. ईशा आणि आनंद यांच्या मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्ण आहे. मुकेश अंबानींच्या कुटुंबात आता चार लहान मुलं आहेत.

Mukesh Ambani became a grandfather again, eldest son Akash’s wife Shloka gave birth to a girl, a boy was born in 2020

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात