Manipur Violence : ‘…तर दिसातच क्षणी गोळ्या घाला’’ परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून मणिपूरमध्ये मोठा निर्णय!

 लष्कर आणि आसाम रायफलच्या ५५ तुकड्याही तैनात

विशेष प्रतिनिधी

इंफाळ : मणिपूरमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मोठा निर्णय जारी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, हल्लेखोरांना पाहताच क्षणी पोलिसांनी गोळ्या घालव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच आदिवासी आणि बहुसंख्य मैतई समुदाय यांच्यातील व्यापक दंगली रोखण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या ५५ ​​कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. In the wake of the violence in Manipur the Governor ordered to shoot at sight

मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिलला एका आदेशाद्वारे मैतेई समुदायाचा अनुसूचित जातीत समावेश करण्याचे निर्देश दिले. त्याला राज्यातील नागा तसेच कुकी या समुदायांनी आक्षेप घेतला आहे. शिवाय मोठा हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मणिपूरचे राज्यपाल अनुसुया उके यांनी संबंधित यंत्रणांना ‘शूट अॅट साईट’ची ऑर्डर दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, परिस्थिती पाहता लष्कराच्या 14 बटालियन्सला स्टँडबाय ठेवण्यात आले आहे. मणिपूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या केंद्राने ईशान्येकडील राज्याच्या हिंसाचारग्रस्त भागात तैनातीसाठी रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) या दंगली हाताळण्यासाठी असलेले विशेष दल पाठवले आहे.

In the wake of the violence in Manipur the Governor ordered to shoot at sight

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात