साताऱ्यात बसून मुंबईत काम; मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला शिंदे स्टाईल उत्तर!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या बदलाच्या अशा काही बातम्या बाहेर आल्या की जणू काही उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार आहेत!! मराठी माध्यमांनी तसा नॅरेटिव्ह चालविला. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांची वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पोस्टर्स लागली. ती त्यांच्या समर्थकांनी लावली आहेत, पण ही पोस्टर्स म्हणजेच जणू काही महाराष्ट्रातले प्रचंड जनमत अजितदादांच्या पाठीशी उभे आहे, असे चित्र मराठी माध्यमांनी उभे केले आहे.Sitting in Satara and working in Mumbai; Shinde style answer to the talk of change of Chief Minister!!

याखेरीज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता भाजपला नकोसे झाले आहेत. भाजपच्या पुढच्या राजकीय कॅल्क्युलेशन्समध्ये ते बसत नाहीत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नागपूर दौऱ्यात मुख्यमंत्री बदलला संदर्भात मोठ्या हालचाली करतील, असा दावाही मराठी माध्यमांनी केला आहे. पण मराठी माध्यमांच्या या “पवारनिष्ठ नॅरेटिव्हला” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामातून काटशह दिला आहे.



सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीसी) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला.

मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला, तसेच सूचनाही दिल्या.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02sDE9HZno8f3d9bpzm9nHALVo7VCHyciyutvk5apMimcZuxKXMmBpSioN4Jk4mEy3l&id=100069364292948

सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याचे निर्देश दिले. इतकेच नाही तर सातारा जिल्ह्यातील नियोजनाच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन देखील केले.

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींवर सतत बोलत राहण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या राजकीय कृतीतून प्रत्युत्तर देत असतात. एकनाथ शिंदे शक्यतो महाराष्ट्रातल्या विरोधकांच्या राजकीय हालचालींवर बोलण्यापेक्षा आणि सतत बाईट जर्नलिझमला प्रोत्साहन देण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर भर देतात. त्यांच्या जाहीर भाषणांपेक्षा त्यांची विधानसभेतली भाषणे अधिक बोचरी असतात आणि ती विरोधकांना टोचतात.

मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या मराठी माध्यमांनी महाराष्ट्राच्या राजकीय हवेत जोरदार चालविल्या असताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्टाईलने प्रत्यक्ष कामातून त्या बातम्यांना किंबहुना मराठी माध्यमांच्या पवारनिष्ठ नॅरेटिव्हला प्रत्युत्तर दिले आहे.

Sitting in Satara and working in Mumbai; Shinde style answer to the talk of change of Chief Minister!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात