लंडनमध्ये हिंदूफोबिया फैलावणाऱ्या प्रा. मुकुलिका बॅनर्जी राहुल गांधींच्या निकटवर्ती!!

प्रतिनिधी

मुंबई : ऑक्सफॉर्ड विद्यापीठात हिंदूफोबियाची शिकार झालेल्या रश्मी सामंतनंतर लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्सच्या करण कटारिया बरोबर धार्मिक भेदभाव झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे त्यांना महाविद्यालयाच्या विद्यार्थी निवडणुकीतून अपात्र ठरवण्यात आले. यामागे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची निकटवर्ती प्रा. मुकुलिका बॅनर्जी यांचे नाव पुढे आले आहे.Prof. who spread Hinduphobia in London. Mukulika Banerjee close to Rahul Gandhi!!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असलेल्या संबंधांमुळे करण कटारिया यांच्या विरोधात मुकुलिका बॅनर्जी यांनी बदनामी करणारी मोहीम चालवली होती. यामुळे करण यांना विद्यार्थी संघाच्या निवडणुकीतून अपात्र केले आहे. बॅनर्जीचा हस्तक्षेप LSE  प्रशासनाच्या नजरेस आणले गेले आहे.



कोण आहेत मुकुलिका बॅनर्जी?

मुकुलिका बनर्जी या लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि राज्यशास्त्र (LSE) मध्ये मानव विज्ञान विषयाच्या प्राध्यापिका आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये दक्षिण आशिया सेंटरच्या निर्देशिका आहेत. मुकुलिका बॅनर्जी दीर्घकाळापासून पश्चिमात्य देशांच्या माध्यमांमध्ये भारतविरोधी भूमिका मांडत आहेत.

फर्स्टपोस्ट सूत्रांच्या माहितीनुसार बॅनर्जी लंडनमध्ये शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावशाली महिला आहेत. त्या डाव्या विचारसरणीचा आणि हिंदू विरोधी प्रपोगंडा प्रचार करतात. त्यांना आरएसएस, हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलणाऱ्या महिला म्हणून ओळखल जात. जानेवारी २०२० मध्ये त्यांनी संडे टाईम्स साठी मोदी मुस्लिमांचा खुलेआम द्वेष करतात आणि भारताच्या संविधानाची चेष्टा करतात, असा दावा करणारा लेखही लिहिला होता.

राहुल गांधींशी संबंध

मुकुलिका बॅनर्जी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी राहुल गांधीची लंडनमध्ये सगळी व्यवस्था केली. राहुल गांधींचा हाउस ऑफ कॉमन्स कमिटीत कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. इथेच राहुल गांधींनी भारतीय लोकशाही धोक्यात आहे हे भाषण करून लोकशाही वाचवायला परदेशी मदत मागितली. याच्या अगोदरही खूप वेळा मुकुलिका बनर्जीने राहुल गांधींचे (LSE) दक्षिण आशिया सेंटरमध्ये संबोधित करण्यासाठी आपल्या कार्यालयाचा वापर करायला दिलेला आहे, ज्याच्या त्या निर्देशिका आहेत.

Prof. who spread Hinduphobia in London. Mukulika Banerjee close to Rahul Gandhi!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात