वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबा यांचे आज पहाटे निधन झाले. त्या जेवढे साधे जीवन जगल्या, त्याच साधेपणाला अनुसरून पंतप्रधान मोदींनी कोणताही सरकारी तामझाम न करता आपल्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर ते लगेच आपल्या कर्तव्याला सामोरे गेले. Another sensitivity of Prime Minister Modi; Called Rishabh Pant’s mother and inquired about his condition
त्याचवेळी त्यांची आणखी एक संवेदनशीलता संपूर्ण जगाने पाहिली. आज सकाळीच भारताचा प्रख्यात क्रिकेटपटू आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला रूडकी – दिल्ली महामार्गावर मोठा अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पंतप्रधान मोदींनी सायंकाळी ऋषभ पंतची आई सरोज पंत यांना फोन करून ऋषभच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर मोदींनी ऋषभ पंत याच्या लवकर बरे होण्याची कामना करणारे ट्विट केले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज सुबह रुड़की सीमा के पास दिल्ली-देहरादून राजमार्ग पर हुई क्रिकेटर ऋषभ पंत की कार दुर्घटना के बाद उनकी मां से बात की और उनके स्वास्थ्य के बारे में जानकारी ली। (फाइल तस्वीर) pic.twitter.com/Lt6pekKnYZ — ANI_HindiNews (@AHindinews) December 30, 2022
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज सुबह रुड़की सीमा के पास दिल्ली-देहरादून राजमार्ग पर हुई क्रिकेटर ऋषभ पंत की कार दुर्घटना के बाद उनकी मां से बात की और उनके स्वास्थ्य के बारे में जानकारी ली।
(फाइल तस्वीर) pic.twitter.com/Lt6pekKnYZ
— ANI_HindiNews (@AHindinews) December 30, 2022
BCCI चा ऐतिहासिक निर्णय; भारतीय स्त्री – पुरुष क्रिकेटर्सना समान वेतन!!
आज सकाळी आपली आई गमावल्यानंतर ज्या पंतप्रधानांनी ताबडतोब कर्तव्याला सामोरे जाणे पसंत केले, त्यांनी त्याच दिवशी सायंकाळी भारताच्या एका क्रीडापटूच्या आईला फोन करून त्याच्या स्वास्थ्याविषयी जाणून घेतले यातून पंतप्रधान मोदींची संवेदनशीलता समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App