विशेष प्रतिनिधी
मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे निकटवर्तीय आणि आयकर विभागाचे छापे पडलेला राहूल कनाल संध्याकाळी सातनंतर कुणासोबत असतो यांची माहिती घेणे गरजेचे आहे. त्याच्यावर इतकी मेहरबानी का? असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.It is necessary to know who is with Kanal after 7 pm, Nitesh Rane’s question
अजून काढा आमच्या घरावर मोर्चा. बोललो होतो ना… वक्त वक्त की बात हैं… , अशा आशयाचं ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. राज्याचे अधिवेशन सुरु असताना आयकर विभागाची छापेमारी सूरू आहे. त्या धर्तीवर विविध प्रतिक्रीया राजकीय नेत्यांनीव्यक्त केल्या. नितेश राणे यांनी छापेमारीवर प्रतिक्रीया दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले असून माध्यमांसमोरही त्यांनी प्रतिक्रीया दिली.
याबाबत एक ट्विट नितेश राणे यांनी केले. त्यात राहलू कनालच्या घरी आयकर विभागाची धाड. अजून काढा आमच्या घरावर मोर्चा. बोललो होतो ना… वक्त वक्त की बात हैं.., अशा आशयाचं ट्विट केले. अर्थातच हे सुचक वक्तव्य विधान राज्य व केंद्राच्या तपासयंत्रणांमध्ये सुरु असलेल्या संघषार्ते द्योतक आहे.
काही विशिष्ट लोक आमच्यावर हल्ले करतात. ईडी बद्दल पंतप्रधानांकडे 13 पानांचे पुराव्या सह पत्र दिले आहे. याबाबत सर्व माहिती पत्रकार परिषदेत मी देणार आहे अशी प्रतिक्रीया संजय राऊतांनी दिली. अशा धाडी, छापेसच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीला शोभणारे नाही. विरोधी पक्ष विरोधात बोलेला तर त्यांच्या विरोधात हे धाड सत्र राबविले जाते अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App