कामे होत नसल्यान नाराज नागरिकांचा मंत्र्यांच्या वाहनावर घेराव, भाजपकडून हल्ला झाल्याचा आपचा कांगावा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीतील छापला भागातील केजरीवाल सरकारच्या कामावर नाराज असलेल्या नागरिकांनी दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या वाहनाचा घेराव केला. मात्र, हा हल्ला असून भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा कांगावा आम आदमी पक्षाने (आप) केला आहे.Disgruntled citizens besiege the minister’s vehicle due to work is not being done, Aap alleged attack by Bjp

आपचे नेते व दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना सोमवारी नजफगड येथे घडली. नजफगड येथे काही विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन नजफगडला गेले होते.



कार्यस्थळाजवळ गेल्यानंतर काही जणांनी सत्येंद्र जैन यांच्या गाडीला घेरले व काही जण वाहनावर चढले. सत्येंद्र जैन यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आम आदमी पाटीर्ने केला आहे. हे कार्यकर्ते भाजपचे असल्याचा आरोप केला.

मात्र, सत्येंद्र जैन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा भाजपने इन्कार केला आहे. हल्ले करणारे कार्यकर्ते भाजपचे नव्हे तर छापला भागातील नागरिक होते. हे नागरिक केजरीवाल सरकारच्या कामावर नाराज असल्याने मंत्र्यांना घेराव केल्याचा दावा भाजपने केला आहे.
.

Disgruntled citizens besiege the minister’s vehicle due to work is not being done, Aap alleged attack by Bjp

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात