वृत्तसंस्था
प्रयागराज : मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्यास संदर्भातले विधेयक केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत सादर केले. या मुद्द्यावरून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यासह सर्व विरोधकांनी जबरदस्त हल्लाबोल केला आहे. Age of marriage of girls from 18 to 21: Attack by opposition in Lok Sabha; Modi’s counter-attack from women’s general assembly in Prayagraj !!
संबंधित विधेयकातील तरतुदी ला अल्पसंख्यांक समाजाचा प्रचंड विरोध असल्याचे सांगत तृणमूल काँग्रेस देखील विधेयकाविरोधात मतदान करेल, असे पक्षाचे गटनेते सुगत रॉय यांनी स्पष्ट केले आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह बाकीच्या विरोधकांनी देखील संबंधित विधेयक घाईने मांडण्यापेक्षा संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवावी अशी सूचना केली आहे.
Most of the beneficiaries are those girls who didn't even have accounts until some time ago. But today they have the power of digital banking….Now daughters of UP have decided that they won't let the previous govts come back to power: PM Modi pic.twitter.com/NSI3YD5i87 — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 21, 2021
Most of the beneficiaries are those girls who didn't even have accounts until some time ago. But today they have the power of digital banking….Now daughters of UP have decided that they won't let the previous govts come back to power: PM Modi pic.twitter.com/NSI3YD5i87
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 21, 2021
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराजमध्ये महिलांच्या महामेळाव्यातून विरोधकांवर याच मुद्द्यावर प्रतिहल्ला चढवला आहे. मुलींना उत्तम शिक्षण मिळावे. त्या आपल्या पायावर उभ्या राहाव्यात. आपल्या कुटुंबाचा आर्थिक निर्वाह करण्यासाठीच्या सक्षम व्हाव्यात. नव्या काळातील आधुनिक शिक्षण त्यांना मिळावे, या सर्व हेतूंनी त्यांच्या लग्नाचे वय 18 वरून 21 करण्याचे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासंबंधीचे विधेयक लोकसभेत मांडले आहे. परंतु त्यामुळे काही विरोधकांच्या पोटात दुखत आहे, अशा तिखट शब्दांमध्ये मोदींनी विरोधी पक्षांवर हल्ला चढवला आहे.
लोकसभेच्या सभागृहात सर्व विरोधक एकवटून मोदी सरकारवर प्रखर हल्ला चढवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र विरोधकांवर हल्लाबोल करण्यासाठी प्रयागराज मधील महामेळाव्याची जागा निवडली आहे. या महामेळाव्याला सुमारे दोन लाख महिला उपस्थित आहेत. या मेळाव्यात मोदींनी महिला सक्षमीकरणाच्या विविध घोषणाही केल्या आहेत. तसेच उत्तर प्रदेशातील कन्या सुमंगल योजनेचे उद्घाटन हे पंतप्रधान मोदींनी केले आहे. महिलांच्या खात्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांची रक्कम मोदी यांनी जमा केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App