महाविकास आघाडी सरकारमध्ये विकास निधी मिळवण्यात राष्ट्रवादी अव्वल ; शिवसेना निधी मिळवण्याच्या बाबतीत काँग्रेसच्याही पिछाडीवर

विकासनिधी मिळवण्यात शिवसेनेचे युवाप्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही फटका बसला आहे. NCP leads in development fund in Maha Vikas Aghadi government; Shiv Sena lags behind Congress in terms of funding


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे तरीसुद्धा निधीवाटपात मात्र शिवसेना ही सत्तेतील तिन्ही पक्षांत तिसऱ्या स्थानी आहे. निधीवाटपात अगदी काँग्रेसनेही शिवसेनेला मागे टाकले आहे. तर अर्थ खाते असणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्यात निधीवाटपात प्रथमस्थानी आहे.विकासनिधी मिळवण्यात शिवसेनेचे युवाप्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण विभागालाही फटका बसला आहे.



शिवसेनेकडे सर्वाधिक जास्त आमदार संख्या असतानाही त्यांच्या वाट्याला आलेला निधी सर्वात कमी आहे. शिवसेनेपेक्षा चौपट जास्त निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना मिळालाय तर शिवसेनेच्या दुप्पट निधी मिळवण्यात काँग्रेस यशस्वी झालंय.

२०२०-२१ वर्षात तिन्ही पक्षाला मिळालेला निधी

हे आकडे २०२०-२१ या वर्षात तिन्ही पक्षाला मिळालेल्या निधीचे आहेत.सर्वात पुढे राष्ट्रवादी काँग्रेस ५३ आमदारांना निधी २ लाख २४ हजार ४११ कोटी मिळाले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे एकूण ४३ आमदार असून निधी एक लाख २४ कोटी मिळाले तर शिवसेनेचे सर्वात जास्त म्हणजे ५६ आमदार असून त्यांना एकूण ५५२५५ कोटी निधी विकासकामांसाठी मिळाला आहे.

NCP leads in development fund in Maha Vikas Aghadi government; Shiv Sena lags behind Congress in terms of funding

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात