विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमधील जमीनीचा व्यवहार झाला तेव्हा सलीम पटेल हा गुंड होता की फरार होता याची आपल्याला माहिती नव्हती, असा दावा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विरोधी पक्ष नेते बॉम्ब फोडत असतील तर मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडीन, असा दावाही नवाब मलिक यांनी केला. Dealt with Salim Patel but I did not know if he was a goon or a fugitive; Claim of Nawab Malik
दाऊदशीच कोणाचेही संबंधच जोडायचे असतील, तर असे कोणाचेही दाऊदचे कोकणातील घर सनातन संस्थेने घेतले आहे. मग सनातनचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असे म्हणायचे का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
गोवावाला कंपाऊंडच्या जमीनीचा व्यवहार झाला तेव्हा सलीम पटेल हा गुंड होता की फरार होता याची मला काहीही माहिती नव्हती, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.
ते म्हणाले, की हसीना पारकरला मी ओळखत नाही. गोवावाल्या कुटुंबाचा पावर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल होता. तेवढ्यापुरताच आमचा त्याच्याशी संबंध आला होता. गोवावाला कम्पाउंडमध्ये आम्ही भाडेकरू होतो. मूळ मालकाच्या सांगण्यावरून आम्ही त्या जागेचे मालक झालो होतो. दुसरं काही नाही. मी कवडीमोलानं कुठलीही जमीन घेतलेली नाही. उलट फडणवीसांचे जवळचे लोक मुंबईत जमिनी कशा हडप करत होते? याची माहिती देईन. मी कुठलाही गैरप्रकार केलेलाच नाही. कुणाच्या दबावाखाली किंवा कुणावर दबाव आणून मी कुठलीही मालमत्ता घेतलेली नाही, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App