• Download App
    ममतांच्या राजकीय गडाचे आणखी चिरे ढासळले; सुवेंदू अधिकारी समर्थक पाच नेत्यांचे राजीनामे | The Focus India

    ममतांच्या राजकीय गडाचे आणखी चिरे ढासळले; सुवेंदू अधिकारी समर्थक पाच नेत्यांचे राजीनामे

    • सगळ्यांची नाराजी ममतांच्या आक्रस्ताळ्या कार्यशैलीवर

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची उलटी गिनती सुरू झालेली असताना त्यांच्या तृणमूळ काँग्रेसला राजकीय भूकंपाचे आणखी हादरे बसले आहेत. बंडखोरांनी ममतांच्या उत्तर बंगाल दौऱ्याचा मुहूर्त त्यांना राजकीय हादरे देण्यासाठी शोधून काढला आहे. suvendu adhikari supporter leaders quit mamata party

    ममतांनी उत्तर बंगालचा दौरा सुरू करतानाच एकाच वेळी भाजपला आणि असदुद्दीन ओवैसींना आव्हान दिले खरे, पण तृणमूळमधली गळती रोखण्यातच त्या अपयशी ठरताना दिसत आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिल्यापाठोपाठ त्यांच्या प्रभाव क्षेत्रात तृणमूळमध्ये पडझड सुरू झाली असून, तृणमूळ काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिले आहेत. suvendu adhikari supporter leaders quit mamata party

    तृणमूल काँग्रेसचे गोबिंदपूर-महेशपूर, बामोण गोला, पकुआ हट, जोग्गोडोल आणि चांदपूर येथील अध्यक्षांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हाध्यक्ष मोसम नूर आणि जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत.

    पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्याने लोकांची कामे करता येत नाही, त्यामुळे राजीनामा देत असल्याचे या नेत्यांनी सांगितलं. “राजीनामे महत्त्वाचे नसून, प्रत्येक विभागात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. बामोणगोला विभागातही पाच समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत,” असं तृणमूल काँग्रेसचे मालदाचे जिल्हा समन्वयक बाबला सरकार यांनी सांगितले आहे.

    या उत्तरात तृणमूळच्या पडझडीचे इंगित आहे. ममतांचा आक्रमक प्रचार हे आत्तापर्यंत त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य होते. पण आता तेच त्यांच्यावर उलटते आहे. कारण त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गणतीतच धरत नसल्याची कार्यकर्त्यांची भावना वाढीला लागली आहे.

    यापूर्वी ममतांच्या कार्यशैलीवर नाराज असलेल्या सुवेंदू अधिकारी यांनी ममतांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अधिकारी यांनी बुधवारी आमदारकीचाही राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर तृणमूळमध्ये भूकंप आला. अधिकारी लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची बातमीही जुनी झाली आहे.

    suvendu adhikari supporter leaders quit mamata party

    कारण अधिकारींनी भाजपमध्ये प्रवेश करो अथवा न करो तृणमूळचे नुकसान होणे अपरिहार्य आहे. त्तर दुसरीकडे तृणमूलच्या नेत्यांनी आणि ममतांनी भाजपावर आणि ओवैसींवर कितीही खापरे फोडली तरी मूळ अपयश त्यांचे स्वतःचे आणि कार्यशैलीचे आहे, यावर शिक्कामोर्तब करूनच तृणमूळमधून स्थानिक नेते बाहेर पडत आहेत.

    Related posts

    पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या ७ नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ‘१५ -२० वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’

    महाराष्ट्र बंद : सोलापुरात युवासेना आक्रमक ; रस्त्यावर टायर जाळून केली बंदची सुरुवात , पहा व्हिडिओ

    पुणेकरांनो सावध रहा ! घरीच थांबा ! पुण्यात तुफान पाऊस , महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला सतर्कतेचा इशारा