वृत्तसंस्था
चंदिगड : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपूर्वी अपात्र घोषित झाल्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने ( Vinesh Phogat )कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी जाहीर केले की, विनेश फोगटचे पदक विजेत्याप्रमाणे स्वागत आणि सत्कार करण्यात येईल.
ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेतीला हरियाणा सरकार जे सन्मान, बक्षिसे आणि सुविधा देते ते विनेश फोगट यांनाही सन्मानाने दिले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सीएम सैनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सांगितले की ती चॅम्पियन आहे.
याआधी विनेश फोगटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती आणि ती म्हणाली होती, “आई, कुस्ती माझ्याकडून जिंकली आहे, मी हरले आहे. माफ कर, तुझे स्वप्न, माझे धैर्य, सर्व तुटले, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती 2001- 2024. तुम्हा सर्वांची मी सदैव ऋणी राहीन.”
विनेशने रौप्य पदकाची मागणी केली
महिलांच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीपूर्वी विनेश फोगटला जास्त वजनामुळे ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले होते, त्यानंतर तिने क्रीडा लवादाच्या न्यायालयात (सीएएस) अपील केले होते. यापूर्वी तिने अंतिम सामना खेळण्यास सांगितले होते, मात्र नंतर लिहिलेल्या पत्रात तिने या स्पर्धेसाठी रौप्य पदक देण्याची मागणी केली आहे.
हरियाणा सरकार सुवर्ण जिंकण्यासाठी सहा कोटी देते
हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला 6 कोटी, रौप्यपदक विजेत्याला 4 कोटी आणि कांस्यपदक विजेत्याला 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना राज्य सरकार 15 लाख रुपयांची रक्कमही देणार आहे. यासोबतच मेडलनुसार ग्रुप ए, ग्रुप बी किंवा ग्रुप सी सरकारी नोकरीही दिली जाणार आहे.
Vinesh Phogat in Haryana to receive silver medal winner’s prize, honors and facilities… Chief Minister’s announcement
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : मनोज जरांगेंचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांना चढला हुरूप, बैठका + कार्यक्रमांना दिला वेग!!
- MVA parties : कुणी नाही मोठे, सगळेच छोटे; महाविकास आघाडी बनली तिळ्यांचे दुखणे!!
- Arvind Kejriwal : ‘अरविंद केजरीवाल यांना पुन्हा अटक करणार का?’ ; उच्च न्यायालयाचा EDला सवाल!
- Nepals Kathmandu : नेपाळमध्ये आणखी एक हवाई दुर्घटना, काठमांडूमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, 5 जणांचा मृत्यू