विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल काकांची पुंगी, आज घालीन लोटांगण; शिंदे – ठाकरेंचे एकमेकांना टोचणं!!, असे राजकारण दोन्ही शिवसेनांमध्ये सुरू आहे.
काल काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागले!!, म्हणून शिंदे शिवसेनेने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना डिवचले होते. आज पुन्हा शिंदे सेनेनेच घालीन लोटांगण वंदीन चरणचे बॅनर ठाण्यात लावले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवारांपुढे उद्धव ठाकरे लोटांगण घालत असल्याचे त्यात दाखवून पुन्हा त्यांना डिवचले.
मात्र आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सेनेला प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले :
आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर ज्यांना सध्या बसवलेलं आहे, ते लोटांगण घालूनच बसले आहेत. आतापर्यंत गेल्या 60 वर्षात सगळे मुख्यमंत्री मिळून जितक्या वेळा दिल्लीला गेले नसतील, तेवढे हे एक मुख्यमंत्री लोटांगण घालायला गेले असतील.
- दिल्लीत फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही तर दिल्ली ही देशाची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते, ते काय लोटांगण घालायला गेले होते का?? पेशव्यांनी दिल्लीत जाऊन दिल्ली जिंकली होती ते काय लोटांगण घालायला गेले होते का?? सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला आम्ही यशवंतरावांचा उल्लेख करतो ते काय लोटांगण घालायला गेले होते का?? चिंतामणराव देशमुखांनी नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकला अर्थमंत्री पदाचा ते काय लोटांगण होतं का??
- उद्धव ठाकरे यांनी मोदी – शाहांच्या जुलमी कारभाराशी, त्या मोगलाईशी आणि दिल्लीशी जी झुंज दिली, त्याला लोटांगण म्हणता येणार नाही. त्याला स्वाभिमान म्हणतात. महाराष्ट्राचे राज्यकर्ते आज दिल्लीच्या दाराचं पाय पुसणं म्हणून बसले आहेत. त्याला लोटांगण म्हणतात.
- महाराष्ट्राचा इतिहास या लोकांनी समजून घ्यावा, ज्यांनी आमचा पक्ष चिन्ह चोरलं, ज्यांनी चोऱ्या लांड्या लबाड्या केल्या, त्यांनी आम्हाला दिल्लीचा राजकारण शिकवू नये. तुमच्या आधीपासून आम्ही दिल्लीला आहोत आणि दिल्ली आम्हाला चांगली माहिती आहे आणि त्या सोनिया गांधीजींच्या पाठिंब्यामुळे आपणही मंत्रिमंडळात होतात महाशय हे लक्षात घ्या.
Both shivsena targets each other over delhi tours
महत्वाच्या बातम्या
- Pawar, Chavan and Patil : पवारांच्या 225 आकड्याला पृथ्वीराज बाबा + जयंत पाटलांचा खोडा; दोघांनी आकडा खाली आणला!!
- 1 लाख मराठा उद्योजकांना शिंदे – फडणवीस सरकारचे 8.5 हजार कोटींचे कर्जवाटप!!; साताऱ्यात लाभार्थी मेळावा
- Railway Paper Leak : रेल्वे पेपर लीक: CBIचे 11 ठिकाणी छापे, 50-60 उमेदवारांना आधीच देण्यात आला होता पेपर
- bank account : बँक खात्यात 4 नॉमिनी जोडता येणार, बँकिंग कायदे विधेयक लोकसभेत सादर