प्रतिनिधी
पुणे : अंगात नाही बळ, हळूच चिमटा काढून पळ!!, अशी खरंच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अवस्था झाली. पुणे जिल्ह्यातल्या दौंड मध्ये येऊन त्यांनी लोकसभेत तब्बल 303 खासदार जिंकून आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबई महापालिका जिंकण्याचे आव्हान दिले. Raut challenged Modi to win the Mumbai Municipal Corporation
संजय राऊत यांनी दौंड मध्ये पत्रकार परिषद घेतली, पण त्या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांना मराठा आंदोलकांच्या संतापला सामोरे जावे लागले. हे तेच संजय राऊत आहेत, ज्यांनी मराठा आंदोलनात मराठा मोर्चांना “मुका मोर्चा” म्हटले होते. त्यामुळे मराठा आंदोलकांचा संजय राऊत यांच्यावर प्रचंड संताप आहे. तो संताप आज आंदोलकांनी राऊतांवर दौंड मध्ये काढला.
“इंडिया” आघाडीची ताकद बघून घुसखोरी करणारा चीन देखील मागे हटेल!!; संजय राऊतांचे अजब तर्कट
त्यानंतर राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मोदींना मुंबई महापालिका जिंकून दाखवण्याचे आव्हान दिले. संजय राऊत म्हणाले, “भारतीय जनता पक्षाकडे निवडणुका जिंकण्याचे मनोबल असेल, तर त्यांनी महाराष्ट्रात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांच्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत महिनाभर थांबून प्रचार करून मुंबई महापालिका जिंकून दाखवावी!!”
राऊतांनी वर उल्लेख केलेले वक्तव्य केले खरे, पण ते हे विसरले की, ज्या मोदींना ते आव्हान देताहेत, त्या मोदींनी भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत दोनदा पूर्ण बहुमत मिळवून दिले. 2014 च्या निवडणुकीत 282, तर 2019 च्या निवडणुकीत 303 खासदार मोदींनी स्वतःच्या बळावर निवडून आणले. पण ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या राजकीय पोपटाचा प्राण मुंबई महापालिकेतच असल्याने त्यापलीकडे त्यांची दृष्टी जात नाही. त्यामुळे त्यांनी मोदींना राष्ट्रीय पातळीवरून खाली खेचत महापालिका पातळीवर आणून निवडणूक जिंकून दाखवण्याचे आव्हान दिले आणि “अंगात नाही बळ, हळूच चिमटा काढून पळ”, हे सिद्ध केले!!
Raut challenged Modi to win the Mumbai Municipal Corporation
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाचे हेमंत पाटील यांनी दिला खासदारकीचा राजीनामा
- महाराष्ट्रात जात नाही तर कर्तृत्त्व, चारित्र्य आणि आचार-विचारालाच महत्व, हे विसरता येणार नाही – रोहित पवार
- फक्त 229 : इंग्लंड विरुद्ध रोहित शर्मा चमकला, पण विराट सकट भारताचा डाव ढेपाळला!!
- थकीत कर्जाची वसुली संध्याकाळी 7 नंतर बंद; एजंट सकाळी 8 वाजेपर्यंत कॉल करू शकणार नाहीत, RBI ने आणले नवीन नियम