विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी राहुल गांधी चक्क खोटं बोलले. अमेरिकन अध्यक्षांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण द्यावे, असे आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेला चार वेळा सांगावे लागले, अशा शब्दांमध्ये त्यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर शरसंधान साधले होते. परंतु, ते वस्तुस्थितीवर आधारित नव्हते त्यामुळे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे कठोर शब्दांमध्ये वाभाडे काढले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेच्या वेळी राहुल गांधींनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून मेड इन चायना या विषयांचा समावेश होता परंतु बोलण्याच्या ओघात राहुल गांधींनी वस्तुस्थितीशी विपरीत भाष्य केले आपला देश परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत कसा कमकुवत आहे हे सांगताना त्यांनी खोटे उदाहरण दिले अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण द्यावे असे आपल्या परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेला चार वेळा सांगावे लागले असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले या सगळ्या वक्तव्यावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला त्यावेळी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत हजर होते.
राहुल गांधींच्या भाषणासंदर्भात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी स्पष्ट शब्दांमध्ये खुलासा करून राहुल गांधी कसं खोटं बोलले याचेच वाभाडे काढले. जयशंकर यांनी या संदर्भात ट्विट केले.
– जयशंकर यांचे ट्विट असे :
राहुल गांधींनी डिसेंबर 24 मधल्या माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत संदर्भातला खोटा संदर्भ दिला. तिथे मी त्या वेळच्या बायडेन प्रशासनातले परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या भेटीसाठी गेलो होतो. तिथे कौन्सिल जनरलच्या बैठकीचे मी अध्यक्षपदही स्वीकारले होते. त्याच दौऱ्यामध्ये ट्रम्प प्रशासनातले त्यावेळचे नियोजित राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार देखील मला येऊन भेटले. परंतु या संपूर्ण दौऱ्यामध्ये कोणत्याही भेटीगाठीच्या वेळी पंतप्रधानांच्या निमंत्रणाविषयी एक शब्दही उच्चारला गेला नाही. तसा विषय देखील निघाला नाही. वास्तविक भारताचे कुठलेही पंतप्रधान कुठल्याही देशाच्या प्रमुख व्यक्तीच्या शपथविधीला उपस्थित राहत नाहीत. भारताचे कौन्सिल जनरल किंवा राजदूत किंवा विशेष निमंत्रित यापैकी कोणीही भारताचे शपथविधी समारंभात प्रतिनिधित्व करत असतात.
राहुल गांधींनी माझ्या अमेरिकेच्या दौऱ्यासंदर्भात चक्क खोटी माहिती सांगितली. त्यांचे वक्तव्य राजकीय दृष्टिकोनातून असेल, पण त्यामुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होते, अशा स्पष्ट शब्दांमध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे वाभाडे काढले.
Rahul Gandhi deliberately spoke a falsehood about my visit to the US in December 2024
महत्वाच्या बातम्या
- म्हणे, गांधी, सुभाष बाबूंबद्दल सावरकर खोटे बोलले, सावरकरांना लोकशाही नको होती; अरुण शौरींचे अनर्गल प्रलाप!!
- दिल्लीत लाडक्या बहिणीला ८ मार्चपासून २५०० रुपये; पंतप्रधान नरेंद्र मोदींची गेम चेंजर घोषणा!!
- DRDO : ओडिशाच्या किनाऱ्यावर DRDOने हवाई संरक्षण प्रणालीची केली यशस्वी चाचणी
- Sonia Gandhi : सोनिया गांधींविरुद्ध बिहारमध्ये खटला दाखल!