विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना भाजपा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुती पदाधिकारी मेळावा आज मुंबईतील वरळी डोम येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.Mahayuti’s Balbhim is ready against Bakasur in Mumbai; Eknath Shinde’s roar
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणारा खरा सूर्याजी पिसाळ कोण हे मुंबईकरांना चांगलेच माहिती आहे. निवडणुका आल्या की सातवीचे इतिहासाचे पुस्तक उघडणारे, आज बाळासाहेबांच्या विचार काँग्रेसच्या दावणीला बांधून त्यांच्या विचारांचे मारेकरी कोण आहेत हे जनतेला चांगले माहित आहे असे यावेळी ठासून सांगितले. मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठीच असेल असेही याप्रसंगी ठणकावून सांगितले.
मुंबई गेली २५ वर्षे या भ्रष्टाचाऱ्यांच्या मगरमिठीत अडकली असून या बकासुरांच्या तावडीतून सोडवण्यासाठी महायुती बलभीम बनून सज्ज झाली आहे. काही लोकांना निवडणुका आल्या कीच मराठी माणूस आठवतो. प्रत्यक्षात यांचा ‘म’ मराठीचा नसून मतलबाचा आहे. वरून किर्तन आणि आतून तमाशा, हाच यांचा खरा चेहरा आहे. मराठी बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी पालिकेत असलेला १० टक्के आरक्षणाचा नियम का रद्द केला. तेव्हा मराठी माणसाबद्दलचा पुळका नक्की कुठे गेला होता असा सवाल याप्रसंगी केला.
यांनी मेट्रो प्रकल्पात अडथळे आणले, बेस्टचा ऱ्हास केला, गिरणी कामगारांची फसवणूक केली, पत्राचाळ आणि बीडीडी चाळ प्रकरण, मिठी नदीतला गाळ, बॉडी बॅग व खिचडी घोटाळे यांचा उल्लेख करत हे कार्यसम्राट नाहीत, हे ‘करप्शन सम्राट’ आहेत, असा घणाघात यावेळी केला.
ही निवडणूक साधी नसून भ्रष्टाचाराचा हिसाब चुकता करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे #धनुष्यबाण आणि #कमळ ही दोनच चिन्हे डोळ्यासमोर ठेवून काम करा आणि विरोधकांचा डब्बा गुल करा असे आवाहन याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपा ज्येष्ठ नेते विनोद तावडे, शिवसेना नेते रामदास कदम, माजी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, राहुल शेवाळे, अमित साटम, खासदार मिलिंद देवरा, खासदार रविंद्र वायकर, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, मंत्री योगेश कदम, मंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे तसेच गौतम सोनावणे आणि सिद्धार्थ कासारे तसेच महायुतीचे पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Mahayuti’s Balbhim is ready against Bakasur in Mumbai; Eknath Shinde’s roar
महत्वाच्या बातम्या
- सगळ्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांची निवडणूक आयोगाकडून चौकशी आणि तपास; तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सेलिब्रेशन!!
- Xi Jinping : जिनपिंग म्हणाले- चीन-तैवानचे एकीकरण निश्चित; अमेरिकेचा इशारा- चीन तणाव वाढवत आहे, बळाचा वापर करून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नये
- पत्रकार परिषदेत अजितदादांकडून स्वतःच्याच माणसांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल; महेश लांडगेंची सोशल मीडियावर पोस्ट!!
- India Economy : 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5.25 पट वाढेल:अहवालात दावा- 21 वर्षांत दरडोई उत्पन्न ₹2.5 लाखांवरून वाढून ₹13.5 लाख होईल