जनतेने केलेली कामाची प्रशंसा हे जीवनातील इतर सर्व पदकांपेक्षाही अधिक पटीने महत्त्वाचे आहे, असेही सांगितले.
विशेष प्रतिनिधी
नाशिक : येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 122 व्या सत्रातील पोलीस उपनिरीक्षक तुकडीच्या ‘दीक्षांत समारंभ-2023 ’ ला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे कौतुक करत, मार्गदर्शनही केले. Maharashtra Police Force is the best in the country Deputy Chief Minister Fadnavis statement
या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानीताई फरांदे, आमदार सीमाताई हिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, पोलीस महासंचालक ,अप्पर पोलीस महासंचालक, महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संचालक यांसह अनेक अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
‘’प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 122 (थेट सेवा) चे प्रशिक्षण सत्र 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होते. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून निवडलेल्या 349 पुरुष आणि 145 महिला आणि 1 गोवा राज्यातील प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. एकूण 494 पोलीस उपनिरीक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यापैकी 88% प्रशिक्षणार्थी पदवीधर आणि 12 टक्के पदव्युत्तर आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘’महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल आहे. जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही पोलिस दलात भरती झालो आहोत, हे भान असणे आवश्यक आहे. समाजाला दर्जेदार सेवा देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. जनसेवा करून या संधीचे सोनं करण्याचे ध्येय ठेवणे आवश्यक आहे. जनतेने केलेली कामाची प्रशंसा हे जीवनातील इतर सर्व पदकांपेक्षाही अधिक पटीने महत्त्वाचे आहे. आपल्या कामाचे सर्वसामान्यांनी कौतुक केले पाहिजे. संविधानाची केवळ शपथ न घेता त्याचे पालन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.’’
याशिवाय, ’’भविष्यातील आव्हाने मोठी आहेत. सायबर गुन्ह्यांसोबतच आर्थिक गुन्ह्यांमध्येही वाढ होत आहे. त्याचाही सामना करण्याची तयारी पोलीस दलात केली जात आहे. समाजातील चांगल्या प्रवृत्तींचे रक्षण करणे आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणे ही आपली जबाबदारी आहे. आपण आरशासमोर उभे राहून आपले प्रतिबिंब पाहिले पाहिजे जेणेकरून आपल्याला कळेल की आपण काय काम करत आहोत. आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. तुमचे ध्येय पैसा, प्रतिष्ठा हे नसून तुम्ही समाजाशी किती एकनिष्ठ आहात हे आहे. नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकॅडमी ही देशातील प्रतिष्ठित अकॅडमी आहे. नाशिक पोलिस अकॅडमीच्या कार्याचा सर्वांनाच अभिमान आहे.’’ असंही फडणवीसांनी सांगितलं.
Maharashtra Police Force is the best in the country Deputy Chief Minister Fadnavis statement
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद, लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू
- राहुल गांधी कायद्याच्या नजरेत दोषीच, फक्त शिक्षेला स्थगिती दिल्याने ते संसदेत येऊ शकतात; महेश जेठमलानींनी मांडली वस्तूस्थिती!!
- २०३० पर्यंत देशात ८०० ‘वंदे भारत’ ट्रेन धावतील, आर के सिंह यांनी सांगितली सरकारची योजना
- आयुष्यातलं सगळ्यात पहिलं नाटक पाहून सैराट फेम रिंकू भावुक, डोळ्यात पाणी आणि मी स्तब्ध असं म्हणत शेअर केल्या भावना