विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadnavis दोन समाजात तेढ निर्माण करणे आमच्या तत्त्वात बसत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका समाजाला संतुष्ट करण्यासाठी दुसऱ्या समाजाला असंतुष्ट करणे सरकारला मान्य नसल्याचेही ते म्हणालेत. सगळ्याचे समाधान काढण्यावर आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यात युती आणि महायुतीच्या सरकारनेच मराठा समाजासाठी चांगले निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.Devendra Fadnavis
मराठ आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत. दुसरीकडे, सरकारने या प्रश्नावर चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. मराठा आरक्षणासाठीच्या शिंदे समितीचे प्रमुख, माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे, चर्चेसाठी आझाद मैदानात पोहोचले आहेत. मात्र, त्यांच्यासोबतची चर्चा निष्फळ ठरली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली.Devendra Fadnavis
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात सरकारची भूमिका पहिल्या दिवशीपासून स्पष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 2014 पासून ते 2025 पर्यंत मराठा समाजाच्या हिताचे निर्णय आमच्या सरकारनेच घेतले. आरक्षणाचा विषय असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या महामंडळाद्वारे आज दीड लाख उद्योजक, जे नोकऱ्या देणारे मराठा तरुण तयार करु शकलो. सारथीमुळे एमपीएससी आणि युपीएससीमध्ये मराठा तरुणांचा टक्का वाढलेला आहे, शिक्षण आणि रोजगार या प्रश्नावर आपण निर्णय घेतलेले आहेत. आपण दिलेले 10 टक्के टिकलेले आहे. पण, काहींची वेगवेगळी मते आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संविधानाच्या चौकटीत बसवून तोडगा काढावा लागेल
कोणत्या राज्याला वाटत असेल की, आपल्या राज्यातील मोठा घटक असंतुष्ट राहावा, त्याच काय फायदा आहे. पण, एकाच्या संतुष्टीकरता दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडणासाठी उभे करा, दुसऱ्याला असंतुष्ट करा हे आम्हाला मान्य नाही. राजकारण चुलीत गेले पण अशाप्रकारे समजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणे हे आमच्या तत्त्वात कुठेही बसत नाही. म्हणून, सगळ्याचे समाधान कसे निघेल असा आमचा प्रयत्न आहे, ते संविधानाच्या चौकटीत बसवून काढावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आजच्या आनंदाचा उद्या बॅकक्लॅश येईल
आपण कुणाला तरी आनंद देण्याची आज एखादी गोष्ट केली, तर उद्या अधिक जोराने त्याचा बॅकक्लॅश आपल्याकडे येईल, त्यामुळे संविधानाच्या चौकटीतून जे काही निर्णय करायचे आहे ते आपल्याला करायचे आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्टपणे भूमिका मांडली.
Maharashtra CM Devendra Fadnavis Maratha Reservation
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!!
- Gujarat : गुजरातेत माजी आमदार, IPS सह 14 जणांना जन्मठेप; सुरतेत बिल्डरचे अपहरण करून 12 कोटींचे बिटकॉइन ट्रान्सफर केले
- Droupadi Murmu : जिनपिंग यांच्या गुप्त पत्रामुळे भारत-चीन संबंध सुधारल्याचा दावा; राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिले- ट्रम्पच्या टॅरिफमुळे आम्हाला त्रास
- Mahua Moitra controversial statement : महुआ मोइत्रांना अमित शाहांवरील वादग्रस्त वक्तव्य भोवणार?: पश्चिम बंगालमध्ये गुन्हा दाखल