• Download App
    प्रधानमंत्री पीक विमा योजनेस महाराष्ट्रात वाढता प्रतिसाद; सुमारे सव्वा कोटी शेतकरी सहभागी!! Increasing response to Pradhan Mantri Crop Insurance Yojana in Maharashtra

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेस महाराष्ट्रात वाढता प्रतिसाद; सुमारे सव्वा कोटी शेतकरी सहभागी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून 1 कोटी 20 लाख 68 हजार शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत. Increasing response to Pradhan Mantri Crop Insurance Yojana in Maharashtra

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. राज्यातील पाऊस, पेरणी आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

    राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ % पाऊस झाला आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० % पेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० % आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ % पाऊस झाला आहे.

    राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ % पेरणी झाली आहे.



    यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे.

    सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ % आणि कापसाची ९६ % झाली आहे.

    जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते.

    Increasing response to Pradhan Mantri Crop Insurance Yojana in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Azov Sea : युक्रेनच्या हल्ल्यामुळे रशियातही होर्मुझसारखे संकट; एझोव्ह समुद्रात जहाजांची वाहतूक थांबली, 9 दिवसांत 116 जहाजांवर हल्ले झाले

    Tragedy Strikes Wari : दिंडीवर काळाचा घाला; पंढरपूरच्या आषाढी वारीतील 7 वारकऱ्यांना ट्रकने उडवले, जेजुरीजवळ 3 महिला भाविकांचा मृत्यू, 4 जखमी

    Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 3 ते 7 जुलैदरम्यान अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा