प्रतिनिधी
मुंबई : प्रधानमंत्री पीक विमा योजनेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असून 1 कोटी 20 लाख 68 हजार शेतकरी त्यात सहभागी झाले आहेत. Increasing response to Pradhan Mantri Crop Insurance Yojana in Maharashtra
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. राज्यातील पाऊस, पेरणी आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
राज्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०४ % पाऊस झाला आहे. १७८ तालुक्यात सरासरीच्या १०० % पेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० % आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ % पाऊस झाला आहे.
राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ % पेरणी झाली आहे.
यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे अधिक पेरणी झाली असून सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे.
सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ % आणि कापसाची ९६ % झाली आहे.
जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने संपूर्ण नियोजन केले आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते.
Increasing response to Pradhan Mantri Crop Insurance Yojana in Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- ईडी संचालक मुदतवाढीसाठी केंद्र पुन्हा सुप्रीम कोर्टात; आज होणार सुनावणी
- “आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल” – पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास!
- निधी वाटपाची कोंडी; शिंदे – फडणवीस, भाजप श्रेष्ठींचे नियंत्रण आणि काँग्रेसचा दबाव यात अजितदादांची खरी कसोटी!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ‘भारत मंडपम’चे उद्घाटन, जाणून घ्या वैशिष्ट्ये