विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : पुत्र सांगतो चरित पित्याचे…, असे चित्र काल कोल्हापूरातील शिवसेना महाअधिवेशनात दिसले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाने “वडील” एकनाथ शिंदे हेलावून गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली. यात त्यांनी हा प्रसंग मांडला. Hearing Srikanth Shinde’s speech, father Eknath Shinde was shocked
तो असा :
शिवसेना राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या सत्रात अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मनोगते मांडली.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा.मनीषा कायंदे, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेली कामे आणि अपेक्षित सुधारणाबाबत मनोगत मांडले. तर माझा मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेतील माझी वाटचाल आपल्या ओघवत्या भाषणातून कथन केली.
“शिवसेना” या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले.
शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा हा प्रवास काल दिसला. तो सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले.
यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते.
Hearing Srikanth Shinde’s speech, father Eknath Shinde was shocked
महत्वाच्या बातम्या
- हातात दगड, पण सरकारच्या प्रस्तावावर शेतकरी सहमत; लेखी हमी मागितली!!
- मणिपुरात एसपी कार्यालयात तोडफोड; वाहने जाळली, तिरंग्याचा अवमान, दोन जण ठार
- दिल्ली – चिपळूण – नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर विरोधक दगड घेऊन रस्त्यावर!!
- पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांना भारत भेटीचे निमंत्रण दिले, 8 भारतीयांच्या सुटकेवर म्हणाले…