• Download App
    ‘समृद्धी’ महामार्गावरील मुंबई- नागपूर प्रवासासाठी प्रवाशांना मोजावा लागणार १२१३ रुपयांचा टोल For Mumbai-Nagpur journey on 'Samrudhi' Highway Passengers will have to pay a toll of Rs. 1213

    ‘समृद्धी’ महामार्गावरील मुंबई- नागपूर प्रवासासाठी प्रवाशांना मोजावा लागणार १२१३ रुपयांचा टोल

    वृत्तसंस्था

    मुंबई : समृद्धी महामार्गावरून मुंबई- नागपूर असा प्रवास करणाऱ्या वाहचालकांना तब्बल १२१३ रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. ही टोलवसुली
    ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे. For Mumbai-Nagpur journey on ‘Samrudhi’ Highway Passengers will have to pay a toll of Rs. 1213

    समृद्धी महामार्ग हा राज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. जलद प्रवास करण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या महामार्गाचे काम आता पूर्ण होत आले आहे. लवकरच तो सुरु होणार आहे. पण, टोलचा विचार केला तर प्रवास खर्चिक असल्याचे दिसते. पण, सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा प्रवास आर्थिकदृष्ट्या डोकेदुखी ठरणारा आहे. मुंबई ते नागपूर हे ७०० किलोमीटरचे अंतर असून एका किलोमीटरसाठी सुमारे पावणेदोन रुपये या प्रमाणे १२१३ रुपये टोलसाठी मोजावे लागणार आहेत.
    समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

    मुंबई ते नागपूर हा ७०१. ४८० किलोमीटर रस्ता असून २६ टोलनाके आहेत. टोल वसुलीसाठी कंत्राटही निघाली आहेत. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे अशा दहा जिल्ह्यांतून हा महामार्ग जातो. तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. मात्र, टोलवरून नाराजी व्यक्त होत आहे.

    नागपूरवरुन मुंबईला जाण्यासाठी १२१३ रुपये आणि परत येण्यासाठी एवढेच रुपये द्यावे लागणार आहे. म्हणजे येत – जाता एकूण २४२६ रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळं हे दर सर्वसामान्यांना नक्कीच परवडणारे नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे टोलनाकेचालक मालामाल होणार आहेत.

    प्रतिकिलोमीटरसाठी टोल (३१ मार्च २०२५ पर्यंत)

    * कार, जीप, व्हॅन किंवा हलकी वाहने – १.७३ रूपये

    * माल वाहतुकीची वाहने, मिनी बस – २.७९ रूपये

    * ट्रक, बस (दोन आसांची) – ५.८५ रूपये

    * तीन आसांची व्यावसायिक वाहने – ६.३८ रूपये

    * चार किंवा सहा आसांची वाहने – ९.१८ रूपये

    * सात किंवा जास्त आसांची वाहने – ११.१७ रूपये

    For Mumbai-Nagpur journey on ‘Samrudhi’ Highway Passengers will have to pay a toll of Rs. 1213

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा