• Download App
    यंदाही वारी बसनेच...मानाच्या १० पालख्या जाणार पंढरपुरात ! देहू-आळंदी पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला १०० जणांना परवानगी Even this time, only 10 buses will go to Pandharpur! 100 people allowed for Dehu-Alandi Palkhi departure ceremony

    यंदाही वारी बसनेच…मानाच्या १० पालख्या जाणार पंढरपुरात ! देहू-आळंदी पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला १०० जणांना परवानगी

    • आषाढी वारी यंदाही बसनेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी मात्र प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : महाराष्ट्रातील लाखो वारकरी संप्रदासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या वारीबद्दल आज पुण्यात निर्णय घेण्यात आला. उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत पालखी सोहळ्याबद्दही चर्चा झाली. यंदाही पायी वारीला परवानगी नाकारण्यात आली असून मानाच्या १० पालख्यांना वारीची परवानगी देण्यात आली आहे.Even this time, only 10 buses will go to Pandharpur! 100 people allowed for Dehu-Alandi Palkhi departure ceremony

    आषाढी वारी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्या नंतर कॅबिनेट बैठकीत चर्चा करून वारी संदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती अजित पवारांनी आज दिली. यंदा पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यंदा देखील वारी बसनेच जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे.

    दहा मानाचा पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला, तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात एकुण १०० लोकांना तर इतर पालख्यांमध्ये ५० जणांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    वाखरी पर्यंत हा पालखी सोहळा बसने जाईल तर पूजा गेल्या वेळ प्रमाणे होईल.

    महाद्वार काल्याला यंदा परवानगी देण्यात आली आहे. तर रथोत्सव साध्या पद्धतीने होईल असे पवार यांनी सांगितले.

    असा असेल यंदाचा पालखी सोहळा –

    पालखी यंदाही बसमधूनच पंढरपूरला जाणार, ज्यासाठी शासन लवकरच अधिकृत आदेश जाहीर करेल

    इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहभागी वारकऱ्यांना वैद्यकीय तपासणी बंधनकारक

    काला आणि रिंगण सोहळ्याला यंदा परवानगी नाही

    रथोत्सवासाठी यंदा फक्त १५ वारकऱ्यांना परवानगी

    प्रत्येक पालखीसोबत फक्त ४० वारकरी असतील

    मानाच्या पालखी सोहळ्याचं आगमन हे दशमीला पंढरपुरात होईल. वाखरीजवळ वाहनं पोहचल्यानंतर पुढील दीड किलोमिटरचं अंतर प्रतिकात्मक स्वरुपात पायी गाठण्याची परवानगी पालख्यांना देण्यात आली आहे. पंढरपूरचं मंदीर यावेळी दर्शनासाठी खुलं करण्यात येणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.

    “आषाढीच्या पायी वारीसाठी वारकरी संप्रदायानं मागणी केली होती. वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत आमची बैठक पार पडली. परंतू कोरोनामुळे सध्याची परिस्थिती पाहता मंत्रीमंडळ बैठकीत फक्त १० प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

    असा असेल दहा मानाच्या पालख्यांना क्रम –

    १) संत निवृत्ती महाराज (त्रंबकेश्वर)

    २) संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

    ३) संत सोपान काका महाराज (सासवड)

    ४) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

    ५) संत तुकाराम महाराज (देहू)

    ६) संत नामदेव महाराज (पंढरपूर)

    ७) संत एकनाथ महाराज (पैठण)

    ८) रुक्मिणी माता (कौडानेपूर-अमरावती)

    ९) संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)

    १०) संत चांगटेश्वर (सासवड)

    Even this time, only 10 buses will go to Pandharpur! 100 people allowed for Dehu-Alandi Palkhi departure ceremony

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस