• Download App
    COVID NEW VARIENT : कोरोनाचा नवा व्हेरिएंट; भारत सरकारकडून सर्व राज्यांना अलर्ट जारी|COVID NEW VARIENT: new variant of Corona; Government of India issues alert to all states

    COVID NEW VARIENT : कोरोनाचा नवा व्हेरिएंट; भारत सरकारकडून सर्व राज्यांना अलर्ट जारी

    भारत सरकार (India Government Alert) अलर्ट झालं आहे. भारतानं सर्व आंतररराष्ट्रीय विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचाणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


    वृत्तसंस्था

    दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरिएंट समोर आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विषाणूच्या B.1.1.1.529 या नवीन व्हेरिएंटबाबत आता भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून परदेशातून येणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिलेत.COVID NEW VARIENT: new variant of Corona; Government of India issues alert to all states

    दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी गुरुवारी कोविड-19च्या या नव्या व्हेरिएंट हा म्युटेशन शोधल्याचा दावा केला आहे. दक्षिण आफ्रिका आणि त्याच्या शेजारच्या बोत्सवानामध्ये कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटची प्रकरणं आढळून आली आहेत.

    केंद्रीय आरोग्य विभागाच्या राज्य सरकारांना सूचना

    एनसीआडीनं नवी कोरोना वेरिएंटचं नाव B.1.1.529. असल्याचं म्हटलं आहेय दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं NGS-SA च्या सदस्य असणाऱ्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांना तात्काळ जिनोम सिक्वेसिंग करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा नवा संक्रामक किती घातक आहे याची तपासणी करण्याचा हेतू या मागे आहे.

    भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूष यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळं व्हिसा संबंधी आणि देशात येण्यासाठी देण्यात आलेली सूट यामुळं देशासमोरील अडचणी वाढू शकतात त्यामुळं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

    परदेशातून येणाऱ्या लोकांचं ट्रॅकिंग करण्याचे आदेश

    भारत सरकारच्या आरोग्य सचिवांनी परदेशातून आलेल्या लोकांचं ट्रॅकिंग करण्यास सांगितलं आहे. जे लोक दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना किंवा हाँगकाँग येथून येतात त्यांची आरोग्य चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय त्यांचे नमुने घेऊन INSOCAG येथे जिनोम सिक्वेंसिग साठी पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    • केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे-
    • या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्यूटेशन झाल्याची नोंद आहे.
    • जोखीम असलेल्या देशांमधून भारतात प्रवास करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात यावं.
    • ही प्रकरणं ओळखली गेली पाहिजेत आणि त्यांची चाचणी केली पाहिजे.

    कोरोनावरील लस घेतली असली तरी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचां आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा नवा वेरिएंट किती धोकादायक आहे हे माहिती नसल्यानं नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

    COVID NEW VARIENT: new variant of Corona; Government of India issues alert to all states

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा