विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार अर्जुन सिंह यांच्या निवासस्थानावर अबॉम्ब फेकल्याच्या घटनेला एक आठवडाही झाला नसताना मंगळवारी सकाळी त्यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट झाला.Bomb blast near BJP MP’s house in West Bengal, alleged by Trinamool goons
अर्जुन सिंह यांनी असा आरोप केला आहे की, सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचे सदस्य आपला जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, सकाळी ९.१० वाजता सिंह यांच्या भाटपाडा निवासस्थानाजवळ २०० मीटरच्या अंतरावर मोकळ्या जागेत हा स्फोट झाला. एनआयएने ८ सप्टेंबरच्या घटनेची चौकशी सोमवारीच आपल्या हाती घेतली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने आठ सप्टेंबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या चौकशीचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला आदेश दिले होते. भाटपारा येथे त्यांच्या घराच्या गेटवर तीन बॉम्ब फेकले गेले. कोलकाता पासून 40 किलोमीटर अंतराव भाटपारा आहे. राज्य पोलिसांनी बॉम्ब पथकाला पाचारण केले असून बॉम्बस्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
सिंह यांनी आरोप केला आहे की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने या हल्याला जबाबदार असलेल्या गुंडांना आश्रय दिला आहे.तृणमूलचे उत्तर २४ परगनाचे अध्यक्ष पार्थ भौमिक यांनी सिंह यांचे आरोप फेटाळले आहेत. खासदार राजकारणातून हे हल्ले घडवित असल्याचे म्हटले आहे.
पश्चिम बंगालचे सरकार या हल्यातून एनआयएलाच आव्हान देत आहे असे सांगून अर्जून सिंह म्हणाले, आज माझ्या घराबाहेर दुसरा बॉम्ब हल्ला करण्यात आला. भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनआयएने अशी स्फोटके कोठून आणली जातात याची चौकशी करावी. मी एक तक्रार दाखल केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार असलेल्या अर्जून सिंह यांनी तृणमूल कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पश्चिम बंगालमधील बैरकपूर भागातील ते वजनदार नेते मानले जातात. त्यांनी भाजपाच्या तिकिटावर बैरकपूरमधून लोकसभेची जागाही जिंकली आहे.
Bomb blast near BJP MP’s house in West Bengal, alleged by Trinamool goons
महत्त्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथांच्या कोरोना व्यवस्थापनाचे ऑस्ट्रेलियातील मंत्र्याकडूनही कौतुक, उत्तर प्रदेश सरकारसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा
- ममता बॅनर्जी यांचा कॉँग्रेसच्या खासदारांवरच भरवसा, वैतागून अॅडव्होकेट जनरलने दिला राजीनामा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा
- महामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती
- भवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप