नितीश कुमारांनी राहुल गांधींची भेट घेतल्यावर भाजपाला कौरवांची आठवण
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी (12 एप्रिल) राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावरून भाजपा आता विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत आहे. सत्ताधारी भाजपाने विरोधी आघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. BJPs criticism of Nitish Kumars visit to Rahul Gandhi
भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी राहुल आणि नितीश यांचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘आणि नितीश कुमार कोणा कोणाच्या पुढे झुकतील ते माहित नाही’. त्याचवेळी भाजपच्या खुशबू सुंदर यांनी त्याची तुलना महाभारतातील कौरवांशी केली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही उपस्थित होते. विरोधकांची एकजूट करून लढायचे आहे, आम्ही सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे काम करत आहोत. असे खर्गे म्हणाले.
तर याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी या आघाडीला भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या पक्षांचे ‘ठगबंधन’ म्हटले आहे.
आत्तापर्यंत अनेक प्रादेशिक नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या ऐक्याचे प्रयत्न करून झाले. त्यामध्ये आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भर पडली आहे. पण त्यांचे प्रयत्न विरोधी ऐक्याचे आहेत की फुटीचे??, हे मात्र समजायला मार्ग नाही. कारण नितीश कुमार आणि तेजस्वी यादव या जोडगोळीने सकाळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, तर सायंकाळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला गेले. दोन्ही भेटीनंतर नितीश कुमार यांनी सर्व विरोधकांची मोट बांधली पाहिजे आणि केंद्रातले सरकार हटविले पाहिजे असे समान मत मांडले असले तरी प्रत्यक्षात दिल्लीतल्या त्यांच्या राजकीय भेटीगाठी विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी होत्या की फूट पाडण्यासाठी होत्या??, हा प्रश्न तयार झाला आहे.
BJPs criticism of Nitish Kumars visit to Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- हेट स्पीचप्रकरणी राहुल गांधींची पाटणा कोर्टात हजेरी, सुशील मोदींनी दाखल केला होता खटला; सुरत कोर्टाकडून यापूर्वीच शिक्षा
- ट्विटरचे एक्स कॉर्पमध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता, एलन मस्क यांचे सूचक ट्विट, 20 एप्रिलला हटणार ब्लू टिक
- लाऊडस्पीकरवर अजानला बंदी, आज जनहित याचिकेवर गुजरात हायकोर्टात सुनावणी; राज्य सरकार सादर करणार उत्तर
- वज्रमुठीची बोटे ढिल्ली पडल्यानंतर 82 वर्षाचा तरुण वज्रमुठ सभेला संबोधित करण्याची चर्चा!!