• Download App
    ‘’भाजपाचे हिंदुत्व मनुवादी होतं, तर शरद पवार खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील का?’’ BJP spokesperson Keshav Upadhyay criticized Sharad Pawar

    ‘’भाजपाचे हिंदुत्व मनुवादी होतं, तर शरद पवार खालील प्रश्नांची उत्तरे मिळतील का?’’

    भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी साधला निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याच्या राजकारणात मागील तीन दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरू आहेत.  तीन दिवसांपूर्वी मोठा राजकीय महाभूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाबंडखोरी झाली. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या ३० पेक्षा अधिक आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. एवढचं नाहीतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अन्य आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आज मुंबईत दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा  म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाचा स्वतंत्र  मेळावा पार पडला. यामध्ये शरद पवारांनी भाजपावर निशाणा साधला. BJP spokesperson Keshav Upadhye criticized Sharad Pawar

    भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी शरद पवारांना उद्देशून १) २०१४ ला स्वतःहून भाजपाला का पाठिंबा दिला?, २) देवेंद्र फडणवीसांच्या २०१४ च्या शपथविधीला तुमच्या नेत्यांना का पाठवलं? ३) २०१७ साली तुमचे नेते वाटाघाटीला वर्षावर का पाठवले? ४) २०१९ साली सत्ता स्थापनेसाठी ५ बैठका का घ्यायला लावल्या? ५) पहाटे पहाटे अजितदादांना भाजपासोबत शपथ का घ्यायला लावली? ६) शिवसेनेतील बंडावेळी भाजपाला पाठिंब्याचं पत्र का तयार ठेवलं? असे प्रश्न विचारले आहेत.

    याशिवाय, ‘’महाविकास आघाडाची अवस्था बांडगुळासारखी झाली आहे. एकमेकांचा जीवनरस शोषून जिवंत राहण्यासाठी धडपडताना तीनही बांडगुळे नष्ट होणार आहेत. आपण एकमेकांच्या आधाराने जगायचे आहे की जगण्यासाठी दुसऱ्याला संपवायचे आहे हे कळले नाही की बांडगुळे आपोआप संपतात हा निसर्गाचा नियमच आहे.’’ अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली आहे.

    BJP spokesperson Keshav Upadhye criticized Sharad Pawar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे विधानसभेत कडाडले; वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही

    PM Modi : पीएम मोदींच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशन अध्यक्ष भारत दौऱ्यावर; मुक्त व्यापार करारावर चर्चा