प्रत्येक 30 मिनिटांनी पश्चिम बंगालमध्ये एका महिलेवर अत्याचार, महिलांविरोधातील भीषण वास्तव एनसीआरबी अहवालाने उघड
प्रत्येक 30 मिनिटांनी पश्चिम बंगालमध्ये एका महिलेवर अत्याचार होतो. पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा बोजवारा उडाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) अहवालाने उघड केले असून, राज्यातील महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण देशातील सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बलात्कार, लैंगिक अत्याचार, छेडछाड, आणि घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये मागील दहा वर्षांत तब्बल 300% वाढ झाल्याची आकडेवारी या अहवालात दिली आहे.