विशेष प्रतिनिधी
कोलकता : दिल्ली विधानसभा निवडणुकीतून धडा शिकायला ममता बॅनर्जींचा नकार; म्हणाल्या बंगाल मधून काँग्रेसच हद्दपार!! Mamatha Banerjee rejects alliance with Congress in West Bengal
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज 10 फेब्रुवारी रोजी तृणमूळ काँग्रेसच्या सगळ्या आमदारांची कोलकत्यात बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसशी आघाडी करायला नकार दिला. पश्चिम बंगालमध्ये मूळात काँग्रेस आता अस्तित्वातच उरलेली नाही. त्यामुळे त्या पक्षाबरोबर युती काय करणार??, असा सवाल त्यांनी केला. पण दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढवली असती तर निकाल वेगळा लागला असता असा दावाही त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या एका आमदाराने दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस वेगवेगळ्या लढल्याने पाच टक्के मतांचा फरक पडला, असे आमदारांच्या बैठकीत सांगितले. परंतु पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेस पक्ष अस्तित्वहीन आहे त्यांची संघटना शिल्लकच नाही असे सांगून ममता बॅनर्जींनी 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी आघाडी करायला नकार दिला. पश्चिम बंगाल मध्ये तृणमूळ काँग्रेस सलग चौथ्यांदा दोन तृतीयांश बहुमताने सत्तेवर येईल, अशी गर्जना ममता बॅनर्जी यांनी केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पुढचा नंबर पश्चिम बंगालचा असेल. तिथे भाजपचा एकतर्फी विजय होईल, अशी वातावरण निर्मिती करायला भाजपच्या नेत्यांनी सुरुवात केली. सुवेंदू अधिकारी आणि अनुराग ठाकूर यांनी तशी वक्तव्ये केली. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींनी राज्यातून काँग्रेसला हद्दपार करत एकटीच्या बळावर भाजपशी टक्कर घेण्याची गर्जना केली. पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक 2026 एप्रिल – मे दरम्यान होणे नियोजित आहे.
Mamatha Banerjee rejects alliance with Congress in West Bengal
महत्वाच्या बातम्या
- आधुनिक भगीरथाचा सन्मान; जल तज्ज्ञ महेश शर्मांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचा राष्ट्रजीवन पुरस्कार प्रदान!!
- Yogi government’ : मिल्कीपूरमध्ये भाजपच्या आघाडीवर योगी सरकारची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Priyanka Gandhi : दिल्ली निकालांवर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या- मी अजून…
- Delhi Results : केजरीवालांचा कालपर्यंत थाट राणा भीमदेवी, पराभव होताच आम आदमी पार्टीच्या ऑफिसला आतून कडी!!