Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- RSS कडवट देशभक्त संघटना:तिच्यावर बंदीची मागणी करणे दुर्दैवी ; लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबतही दिली अपडेट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. तिच्यावर बंदीची मागणी करणे दुर्दैवी असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बंदीची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सदरील विधान केले. तसेच लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.