आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती.यावेळी मोठया प्रमाणात धूर झाल्याने धूर हा चौथ्या मजल्यापर्यंत गेला होता. Thane: A fire broke out in the meter room of Lodha Luxuria at Majivada.
विशेष प्रतिनिधी
ठाणे : बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माजीवडा येथील लोढा लक्सुरिया, वेस्ट गेट ‘सी’ या २७ मजली बिल्डिंगच्या तळमजल्यावरील एमएसईडीसीच्या मीटर रूमला आग लागल्याची घटना समोर आली.या आगीत त्या खोलीतील ८१ मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत.
या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, कोणतीही दुखापत झालेली नाही.दरम्यान आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती.यावेळी मोठया प्रमाणात धूर झाल्याने धूर हा चौथ्या मजल्यापर्यंत गेला होता.या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ,एमएसईडीसी अधिकारी, तसेच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान यावेळी १-फायर इंजिन आणि १-जंबो वॉटर टँकर पाचारण केले होते.
Thane : A fire broke out in the meter room of Lodha Luxuria at Majivada
महत्त्वाच्या बातम्या
- National Youth Day : PM मोदी म्हणाले – 2022 हे वर्ष भारतीय तरुणांसाठी महत्त्वाचे, भारतीय तरुण संपूर्ण जगाच्या युनिकॉर्न इकोसिस्टिममध्ये चमकणार
- कर्नाटकात केमिकल गळती , २२ कामगारांची प्रकृती चिंताजनक
- लतादीदींना न्युमोनिया, आणखी 10 -12 दिवस ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्येच उपचार
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रांच्या नेतृत्वाखालील समिती चौकशी आणि तपास करणार