Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या कार्यपद्धतीवर उबाठा सेना नाराज; 4 मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांची राऊतांकडे तक्रार
सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, दौंड आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांंनी थेट खासदार संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली. राऊत यांच्या सूचनेवरून सुषमा अंधारे यांनी ही बाब जाहीर केली. त्यामुळे सुप्रियांनी सावध पवित्रा घेत नाराजांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.