Supriya Sule : सुप्रिया सुळेंची नाव न घेता अर्थमंत्री अजित पवारांवर टीका- महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडली, ‘पिक्सल डिफिसिएट’वरून घणाघात
सरकारकडे योजनांसाठी देण्यास देखील पैसे नाही. लाडकी बहिण योजनेतही पहिल्याच टप्प्यात 26 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी नाव न घेता अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.