Supreme Court : हायकोर्ट जजच्या घरी लागलेल्या आग-रोख प्रकरणात नवे वळण; कॅश सापडली नाही; सुप्रीम कोर्टाने म्हटले – अफवा पसरवल्या गेल्या
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला लागलेल्या आगी आणि रोख रक्कम जप्तीच्या प्रकरणात शुक्रवारी संध्याकाळी एक नवीन वळण आले. दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग म्हणतात की, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरातील आग विझवताना अग्निशमन दलाच्या पथकाला कोणतीही रोकड सापडली नाही.