Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!
operation sindoor च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवून त्यामध्ये चर्चा केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोनदा पत्र लिहून केली. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीने त्या मागणीत खोडा घातला. संरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर गंभीर चर्चा होणे अपेक्षित आहे. ती संसदेच्या विशेष अधिवेशनात करण्यापेक्षा सर्वपक्षीय बैठकीत चांगली होऊ शकते, असे पवार म्हणाले.