Rohit Sharma :चॅम्पियन ट्रॉफीसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दुबईला रवाना
१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होत आहे. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. तर टीम इंडिया आपले सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळणार आहे. दरम्यान, शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया दुबईला रवाना झाली आहे.