Raj Thackeray : सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, ‘मनसे’ नक्की सरकारच्यासोबत आहे – राज ठाकरे
जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर अवघा देश हादरला आहे. सर्वस्तरातून या हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे. तर सरकारनेही आता दहशतवाद्यांना या हल्ल्यामागील सूत्रधारांना सोडलं जाणार नसल्याचा कडक इशारा दिला आहे. यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे.