उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!
भर उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!, असे आज घडले.
भर उन्हाळ्यातल्या व्हॅलेंटाईनच्या गुलाबाचे काटे श्रावणामध्ये झडले; मातोश्रीवर लाल गुलाबांचे बंधू प्रेम फुलले!!, असे आज घडले.
मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर त्याने मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा खडा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी – अमराठी वादावर भाष्य करताना उपस्थित केला आहे. त्यांनी यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाचे वा नेत्याचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख महाराष्ट्रातील विरोधी पक्षांवर विशेषतः ठाकरे बंधूंवर होता हे स्पष्ट आहे.
मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर राज्यात रंगत असलेला वाद आता अधिकच तीव्र होत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा जोमात उचलून धरल्यानंतर, आता भाजपचे खासदार व लोकप्रिय गायक-अभिनेता मनोज तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो महाराष्ट्रात समाप्त होईल,’ असा थेट इशारा त्यांनी दिला असून, मराठी अस्मितेचा खरा आदर भाजपच करत असल्याचा दावा केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेद्वारे त्यांच्यावर हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेमुळे राज ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अनेक वर्षांनी आम्ही दोघे एका व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. परंतु, त्यानंतर राज ठाकरे यांनी युतीबद्दल सावध भूमिका घेतली असून मराठीच्या मुद्यासाठी आम्ही एकत्र आलो असून यात राजकीय मुद्दा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक जाहीर होऊ द्या, मग चर्चा करू शकतो.
त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आव्हान केले होते. तुम्ही उत्तर भारतात येऊन दाखवा, तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे दुबे म्हणाले होते. यावर आज मीरा रोडमध्ये बोलतांना राज ठाकरे यांना खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
जे बोलले नाहीत, तेच राज ठाकरेंच्या तोंडात घातले, त्यामुळे राज ठाकरेंनी टाइम्स ऑफ इंडिया सकट सगळ्या मराठी आणि इंग्रजी पत्रकारितेचे वाभाडे काढले.
राज्यात हिंदी भाषिक नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात आग्रा येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फतेहाबाद रोड बसई मंडी येथे निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा पुतळा जाळून निषेध करत राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली आणि हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांचा निषेध केला.
राज्यात महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यानंतर या दोघांची पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता अधिकच वाढली होती. मात्र, विजयी मेळावा मराठी पुरताच होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा अनिश्चिततेच्या वाटेवर गेली आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला, पण याचा फक्त आनंद साजरा करू नका
उत्तर भारतीय नेते आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा घणाघात केला आहे. भाषा लोकांना जोडते, ती तोडत नाही. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय यांच्यातील नाते तुमच्या वागण्यामुळे तुटणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी राज ठाकरेंनी वाचले पाहिजे ते वाचत नाही असे वाटते असा टोलाही लगावला आहे.
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. देशभरातून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आता जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुकतेश्वरानंद यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या भूमिकेवर टीका केली आहे.
राज्यात सध्या मराठी भाषा आणि हिंदी भाषिकांवरून सुरू असलेल्या राजकीय वादात आता समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी उडी घेतली आहे. “हिम्मत असेल तर बॉलिवूडला मुंबईबाहेर काढून दाखवा,” असे थेट खुले आव्हान त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे.
मुंबईत सध्या मराठी-अमराठी वाद सुरू असून, याबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मराठीच्या मुद्द्यावरून वाद सुरू असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रसारमाध्यमांशी न बोलण्याचे आणि कोणतीही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त न करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तसेच प्रवक्त्यांनी पक्षाची बाजू मांडण्यापूर्वी माझी परवानगी घ्यावी, असेही राज ठाकरे यांनी आदेशात म्हटले आहे.
मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो. तुमच्यात धमक असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे आव्हान भाजप नेता व भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे. उद्योजक सुशील केडियाने देखील काही दिवसांपूर्वी मी मराठी शिकणार नाही, काय करायचे ते करा, अशा शब्दात आव्हान दिले होते. परंतु केडियाने आता माघार घेतली आहे. परंतु, आता दिनेश लाल यादव यांनी केलेल्या आव्हानामुळे नवीन वाद सुरू होणार आहे.
राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच मलाच मिळतील, अशा उपरोधिक सूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य केले आहे. मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असे सांगण्यात आले होते की, तिकडे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचे भाषण झाले, असे ते म्हणाले.
पुण्यात एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना अशा प्रकारच्या नाऱ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
गत काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरेंसारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना या प्रकरणी योग्य ते उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला वाजत – गाजत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ या मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः ठाकरे बंधू केव्हा एकत्र येणार? हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्नही या निमित्ताने निकाली निघाला आहे.
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय महायुतीसरकारने रद्द केले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार देखील उपस्थित होते. आता यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया देणे सुरू केले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली, असे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली होती. मराठी माणसांची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर भेटीगाठी घेत आहेत,
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेच्या प्रमुख राज ठाकरे यांना चांगलेच अंगावर घेतले आहे. राज यांच्या विरोधातील तक्रारीनंतर मनसे कार्यकर्त्याकडून धमकी देण्यात आली आहे. राज ठाकरे यांना सुधारायला सांगा असा सल्ला सदावर्ते यांनी धमकी देणाऱ्या कार्यकर्त्याला दिला.
आपण हिंदू आहोत हिंदी नाही, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मराठी भाषेची शक्ती दक्षिण भारतातील राज्यात कराल का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आज भाषा सक्ती करत आहात, उद्या इतरही सक्ती होऊ शकते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावला जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी सरकारला दिलेली पत्र देखील त्यांनी वाचून दाखवले. तसेच त्यांनी राज्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिले असून राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या निर्णयामागे आयएएस लॉबी असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला दोन भाषांचा आग्रह चुकीचा असल्याचे ठणकावून सांगितले. संपूर्ण देशात नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) 3 भाषांचे सूत्र लागू असेल, तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रात हिंदीसाठी अनिवार्य हा शब्द काढून टाकण्यात आला आहे परंतु मराठी आणि इंग्रजीनंतर ती तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.