Rahul Gandhi : सावरकरांवर टीका केल्याबद्दल राहुल गांधींना 200 रुपये दंड; लखनऊ कोर्टाने म्हटले- 14 एप्रिलला हजर राहा
लखनऊच्या एका न्यायालयाने बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला. सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) न्यायालयाने दंड ठोठावला. तसेच १४ एप्रिल २०२५ रोजी न्यायालयात हजर राहावे, जर ते या तारखेलाही हजर राहिले नाहीत तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा दिला.