Rahul Gandhi राहुल गांधींची फडाफाडी; काँग्रेसला डब्यात घालणारीच!!
राहुल गांधींची फाडाफाडी; काँग्रेसला डब्यात घालणारीच!!, असे म्हणायची वेळ त्यांनी केलेल्या आजच्या फाडाफाडीमुळे आली
राहुल गांधींची फाडाफाडी; काँग्रेसला डब्यात घालणारीच!!, असे म्हणायची वेळ त्यांनी केलेल्या आजच्या फाडाफाडीमुळे आली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाग घेतल्यानंतर बाहेर पडलेल्या राहुल गांधींनी बुधवारी ऑपरेशन सिंदूरवर केंद्र सरकारला प्रश्न विचारले. राहुल म्हणाले- सरकार म्हणते की ऑपरेशन सिंदूर सुरू आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ते थांबवण्याचा दावा केला आहे.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी हे अति डाव्या विचारसरणीने ग्रस्त असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जन सुरक्षा विधेयकाला आता काँग्रेस विरोध करत आहे. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध वाराणसीमध्ये खटला दाखल केला जाणार आहे. सोमवारी वाराणसीच्या एमपी-एमएलए न्यायालयाने माजी पंतप्रधानांनी दाखल केलेली याचिका स्वीकारली. राहुल गांधींवर अमेरिकेत शिखांविरुद्ध प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर दुसऱ्यांदा, इंडिया अलायन्सचे नेते १९ जुलै (शनिवार) संध्याकाळी भेटणार आहेत. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) त्यात सहभागी होणार नाहीत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडावे, असे म्हटले आहे.
मंगळवारी दुपारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लखनौ न्यायालयात आत्मसमर्पण केले. ५ मिनिटांनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आलोक वर्मा यांनी राहुल यांना २०,००० रुपयांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राहुल यांच्या वकिलाने जामीन अर्ज दाखल केला होता, जो न्यायालयाने स्वीकारला. राहुल सुमारे ३० मिनिटे न्यायालयात थांबले.
राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाशी संबंधित जनहित याचिकेत शुक्रवारी एक नवीन ट्विस्ट आला. याचिकाकर्ते एस. विघ्नेश शिशिर यांनी लखनौ उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यामध्ये लंडन, व्हिएतनाम आणि उझबेकिस्तानमधून मिळालेले नवीन व्हिडिओ आणि कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत.
बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण विरोधात (एसआयआर) बुधवारी विरोधी पक्षांनी राज्यभर निदर्शने केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह आघाडीचे विरोधी पक्षनेते पाटण्यातील निषेधात सहभागी झाले. विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने सुरू केलेली ही प्रक्रिया ‘मोठ्या संख्येने मतदारांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवेल,’ ज्याचा सत्ताधारी एनडीएला फायदा होईल.
विरोधी पक्षांनी आणि डाव्या कामगार संघटनांनी आज भारत बंद पुकारला होता. त्याचा परिणाम संपूर्ण देशभर तर काही दिसला नाही तो फक्त काही विशिष्ट राज्यांमध्येच दिसला.
राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळीत तरी कुठे लागला दिवा??, असा सवाल विचारायची वेळ राहुल गांधींच्या विरोधी पक्ष नेत्याच्या परफॉर्मन्स वरून आली.
लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्याच्या वर्षभराच्या कामाचा लेखाजोखा; संसदीय भाषणे सगळ्यात कमी, बाकीच्याच कार्यक्रमांचा गाजावाजा!!, हे सत्य दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या अहवालातून समोर आले नसून दस्तूर खुद्द राहुल गांधींच्या सोशल मीडिया अकाउंट वरून उघड झाले आहे.
स्वातंत्र्यापासून गांधी-नेहरू कुटुंबाचा काँग्रेसवरील प्रभाव दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर दशकांमागून दशके तो वाढतच गेला. १९९१ मध्ये राजीव गांधींच्या निधनानंतर आणि त्यानंतर नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर काही वर्षांसाठी हा प्रभाव थोडा कमी झाला. परंतु, सामान्य जनतेमध्ये काँग्रेस म्हणजे गांधी कुटुंब होते.
निवडणूक आयोगाने (EC) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी त्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ANI नुसार, हे पत्र १२ जून रोजी मेलद्वारे आणि राहुल यांच्या निवासस्थानी देखील पाठवण्यात आले.
राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांच्या या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर दिले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी यांच्या अपमानास्पद पराभवाचे दुःख वाढले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. ते अजून किती काळ हवेत बाण सोडत राहणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया सतत आपल्या टार्गेटवर ठेवली. त्यांनी भाजपपासून निवडणूक आयोगापर्यंत सगळ्यांवर आरोप केले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. आज राहुल सुनहरी बाग रोडवर बांधलेल्या टाइप-८ बंगल्यात स्थलांतरित झाले आहेत. हा बंगला त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून देण्यात आला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज त्यांचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल ‘X’ वर लिहिले आहे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
जितेंद्र आव्हाड बनले “राहुल गांधी”; निवडणूक लढण्याच्या आधीच दिलीप पराभवाची कबुली!!, असला प्रकार खरंच झालाय. ज्याप्रमाणे राहुल गांधींनी बिहार विधानसभेची निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होण्यापूर्वीच पुढल्या पराभवाची कबुली देण्यासाठी कारणे शोधली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून देशभरातील दलित आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आव्हानांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की देशातील सुमारे ९०टक्के विद्यार्थी वंचित समुदायातून येतात आणि त्यांच्या शिक्षणाच्या मार्गात दोन मोठे अडथळे आहेत. ते म्हणजे १. निवासी वसतिगृहांची वाईट अवस्था आणि २. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये प्रचंड अनियमितता आणि विलंब.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा करत मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. त्यांनी जाहीर केलं की, मुंबईतील सर्व लोकल ट्रेन लवकरच एसी (AC) केल्या जातील आणि त्यासाठी प्रवाशांकडून कोणतीही भाडेवाढ केली जाणार नाही.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी निवडणूक आयोगाला विचारले की ते महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतदार यादी कधी उपलब्ध करणार? निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रासाठी २००९ ते २०२४ पर्यंतची मतदार यादीची माहिती शेअर करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगासमोर अधिकृत निवेदन देण्याऐवजी माध्यमांतून आरोपांचे वार करणे सुरू आहे. आयोगाशी अधिकृतपणे संवाद साधणे राहुल गांधी टाळत आहेत. आतापर्यंत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला साधे पत्रही लिहिले नाही.
नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर थेट आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ करण्यात आले होते, ज्यामध्ये भाजपचा विजय आगाऊ सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते.
महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंगची तयारी याचा अर्थ राहुल गांधींच्या आरोपातच पराभवाची कबुली!! असे म्हणायची वेळ राहुल गांधींच्या लेखाने आणली.