मोदींची आदमपूर हवाई तळाला भेट; बहादूर जवानांविषयी व्यक्त केली कृतज्ञता!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी पंजाब मधल्या होशियारपूर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या आदमपूर हवाई तळाला भेट दिली. तिथल्या बहादूर जवानांची संवाद साधत त्यांच्याविषयी संपूर्ण देशाची कृतज्ञता व्यक्त केली.