शरद पवारांकडून कोणी वदवून घेऊ शकत नाही; जयंत पाटलांचा प्रशांत जगतापांच्या वक्तव्याला छेद
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करायची नाही. त्याऐवजी पुण्यात महाविकास आघाडी एकत्र येऊनच निवडणूका लढवायच्या या धोरणाला शरद पवारांनी मान्यता दिली, असा दावा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केला होता. परंतु, प्रशांत जगताप यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छेद दिला.